Cow Eating Panipuri: रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉलवर गाईने आपल्या वासरासह खाल्ली पाणीपूरी; Watch Viral Video

व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येकाला पाणीपुरी आवडते'.

Cow Eating Panipuri (PC - Youtube)

Cow Eating Panipuri: सोशल मीडियामुळे देशात आणि जगात बरेच बदल झाले आहे. ज्या गोष्टींचा लोक विचार करू शकत नाहीत किंवा पाहू शकत नाहीत, त्या गोष्टी घरबसल्या पाहायला मिळत आहेत. अनेकवेळा अशा गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. कारण, या व्हिडिओमध्ये एक गाय आपल्या वासरासोबत पाणीपुरी (Panipuri) खाताना दिसत आहे.

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असले, तरी काही व्हिडीओ असे असतात की, जे पाहून तुमची नजर हटत नाही. सहसा तुम्ही माणसांना अन्न खाताना पाहिलं असेल. असेही म्हटलं जात की, मनुष्याला अन्नाची सर्वाधिक आवड असते. पण, हा व्हिडीओ पाहिल्यास तसे दिसत नाही. कारण, प्राणीही खाण्याचे शौकीन असतात. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती गोलगप्पा म्हणजेचं पाणीपुरी खात आहे. तेवढ्यात एक गाय वासरू घेऊन तिथे पोहोचली. ती व्यक्ती या गायीला आणि वासराला मोठ्या आनंदाने पाणीपुरी खाऊ घालू लागते. गाय आणि वासरू ज्या पद्धतीने पाणीपूरी खात आहेत, हे पाहून सर्वांनाचं आश्चर्य वाटत आहे. या व्हिडिओने लोकांची मने जिंकली आहेत. (वाचा - Shocking Viral Video: गरीबाच्या पोटावर पाय! छोट्याच्या चुकीवरून संतापलेल्या महिलेले फेरीवाल्याची फळे जमिनीवर फेकली, व्हिडिओ व्हायरल )

हा व्हायरल व्हिडिओ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'प्रत्येकाला पाणीपुरी आवडते'. सामान्य लोकही हा मजेदार व्हिडिओ शेअर करत आहेत. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओला 16 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. व्हिडिओवर यूजर्स मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत.