Teen Sex & Drink Party: महिलेने आपल्या मुलासह त्याच्या मित्रासाठी ठेवली ड्रिंक पार्टी, नशेत धुंद मुलींसोबत सेक्स करण्यासाठी केले प्रोत्साहित

कॅलिफोर्नियात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांसाठी सिलिकॉन वॅली येथील घरी आणि अन्य ठिकाणी दारुच्या पार्टीत मुलींसोबत सेक्स करण्यासाठी प्रोत्साहत करण्याचा आरोप एका महिलेवर लावण्यात आला आहे.

प्रतिकात्मक फोटो. (Photo Credit: PTI)

Teen Sex & Drink Party:  कॅलिफोर्नियात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलासह त्याच्या मित्रांसाठी सिलिकॉन वॅली येथील घरी आणि अन्य ठिकाणी दारुच्या पार्टीत मुलींसोबत सेक्स करण्यासाठी प्रोत्साहत करण्याचा आरोप एका महिलेवर लावण्यात आला आहे. 47 वर्षीय शैनन मॅरी ओ'कॉनर हिला राहत्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आहे. फिर्यादीने मंगळवारी एका विधानात असे म्हटले की,ती सांता क्लारा काउंटीमध्ये प्रत्यार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. जिथे तिच्यावर लैंगिक बॅटरी, मुलांचा विनयभंग आणि अल्पवयीन मुलांना दारू पुरवण्यासह 39 गुन्हेगारी आरोपांचा सामना करावा लागत आहे.

डिसेंबरमध्ये आपल्या लॉस गॅटोस मधील घरात एका पार्टीत ओ'कॉनर हिने कथित रुपात एका मुलाला कंडोम दिले आणि त्याला नशेत धुंद असलेल्या मुलीसोबत एका रुममध्ये ढकलले. दोघे ही अल्पवयीन होते. सांता क्लारा काउंटी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी अन्वेषक क्रिस्टीना हँक्सने न्यायालयात दाखल केलेल्या माहितीमध्ये सांगितले की मुलगी दूर जाऊ शकली आणि स्वतःला बाथरूममध्ये बंद केले.(Viral Videos: प्रियकर प्रेयसीच्या प्रपोजमध्ये कुत्र्याचा अडथळा; मध्येच थांबववावा लागला कार्यक्रम)

हँक्स यांनी म्हटले की, महिलेने आपल्या घरी जवळजवळ 14 मुलांसोबत न्यू ईअर ईव पार्टी ठेवली होती. या दरम्यान, नशेत धुंद असलेल्या एका अल्पवयीन मुलाला मुलीचे लैंगिक शोषण करताना पाहिले आणि कथित रुपात हसताना पाहिले. आणखी एका प्रकरणी कथित रुपात नशेत धुंद असलेल्या एका अल्पवयीनला रुममध्ये घेऊन आली आणि तेथेच एका 14 वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. त्या मुलीने तपासकर्त्यांना सांगितले, अन्य एका पार्टीत ती ऐवढी नशेच्या धुंदीत होती की ती एका हॉट टबमध्ये बुडून गेली होती.

फिर्यादीने आरोप लावला की, महिलेला शॅनन ब्रुगा नावाने सुद्धा ओळखले जाते. तिने बिअर, वोडका, व्हिस्की आणि दारु खरेदी केली. तर 14-15 वर्षादरम्यानच्या अल्पवयीन मुलांना दारु पिण्यासह त्यांना मुलींसोबत सेक्स करण्यासाठी प्रोत्साहित केले. कोर्टाच्या कागदपत्रांनुसार, तिने त्यांना पार्ट्यांबद्दल गुप्तता ठेवण्यास सांगितले. त्याचसोबत काही अल्पवयीन मुलांना त्यांच्या घरातून मध्य रात्री घराबाहेर पडण्यास मदत ही केली.

असे सांगितले जात आहे की, महिलेने जून 2020 आणि मे 2021 दरम्यान कमीत कमी सहा पार्ट्यांचे आयोजन केले होते. त्यामधील सर्वाधिक मोठी पार्टी गेल्या वर्षात ऑक्टोंबर मध्ये लॉस गॅटोस येथील एका घरी केली होती. यामध्ये 20 अल्पवयीन मुलांनी समावेश घेतला होता. हैराण करणारी गोष्ट अशी की. महिलेद्वारे आयोजित या पार्ट्यांची खबर तिच्या पतीला सुद्धा नव्हती.