Ratan Tata यांच्या बर्थ डे निमित्त खरंच टाटा 479 रूपयांचा मोफत रिचार्ज देत आहेत? जाणून घ्या WhatsApp वरील वायरल पोस्ट मागील सत्य

त्यामध्ये दावा केला जातो की सर्व्हे पूर्ण भरल्यानंतर किंवा अन्य टास्क पूर्ण केल्यानंतर फ्री रिचार्ज मिळेल. ही लिंक सेफ नाही.

Viral post claims Tata is offering free recharge on Ratan Tata’s Birthday (Photo Credit- Viral Post)

सोशल मीडीयामध्ये अनेक उलट सुलट बातम्या त्यामधील सत्यता न पडताळता झपाट्याने शेअर होत असतात. सध्या सोशल्ल मिडीयात अशीच वायरल होणारी एक पोस्ट म्हणजे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त (Ratan Tata Birthday) टाटा 479 चा रिचार्ज मोफत देत आहे. ज्याची व्हॅलिडीटी 56 दिवसांची असणार आहे. या मेसेज सोबत एक लिंक देखील शेअर केली जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम वर हा मेसेज अधिक फॉर्वर्ड होत आहे. यामध्ये दावा केला जात आहे की रतन टाटा यांच्या जन्मदिनानिमित्त कंपनीकडून हे मोफत रिचार्ज दिले जात आहेत. हा क्लेम करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. सर्व्हे फॉर्म भरा. तो भरल्यानंतर युजर्सना तो व्हॉट्सअ‍ॅप आणि अन्य सोशल मीडीया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यास सांगितलं जातं. आणि रिचार्ज मिळवण्यासाठी https://mahacashback.com/.यावर क्लिक करण्याच्याही सूचना असतात.

पहा वायरल पोस्ट

Viral post on social media claims Tata offering free recharge on Ratan Tata’s Birthday (Photo Credit- Viral Post)दरम्यान या लिंकवर क्लिक केल्यास युजर्सना एका संशयित वेबसाईट वर रिडिरेक्ट केले जाते. त्यामध्ये दावा केला जातो की सर्व्हे पूर्ण भरल्यानंतर किंवा अन्य टास्क पूर्ण केल्यानंतर फ्री रिचार्ज मिळेल. ही लिंक सेफ नाही. तसेच यामधून रिवॉर्ड मिळण्याची देखील खात्री नाही. उलट लिंकवर क्लिक केल्याने डेटा लीक होण्याचा धोका आहे. तसेच टाटा कडून कोणतीही ऑफर नसल्याने अशा खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवणं फ्रॉड आहे.