तमिळनाडू येथे हत्तीणीने Mouth Organ वाजूवन सर्वांना केले थक्क, पाहा व्हिडिओ

तमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका हत्तीणीने चक्क बाजा (Mouth Organ) वाजवून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना थक्क केले आहे.

लक्ष्मी हत्तीण (फोटो सौजन्य-ANI)

तमिळनाडू (Tamil Nadu) येथे एका हत्तीणीने चक्क बाजा (Mouth Organ) वाजवून आजूबाजूच्या परिसरातील लोकांना थक्क केले आहे. तसेच या हत्तीणीला तिच्या मालकाकडून ट्रेनिंग देण्यात आली आहे. तर सध्या सोशल मीडियावर हा व्हिडोओ व्हायरल होत असला तरीही तो जुना आहे.

ठक्कमपट्टी येथे लक्ष्मी नावाच्या हत्तीणीने बाजा वाजवून सर्वांना चकित केले आहे. तसेच लक्ष्मीला बाजा वाजवण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिला प्रशिक्षण देताना लक्ष्मीने तीन-चार वेळा बाजा तोडून ही टाकला. परंतु लक्ष्मीच्या मालक बालनने तिला बाजा वाजवण्याचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न सोडला नाही.

अथांग मेहनत आणि लक्ष्मीला दिलेले प्रशिक्षण याच्या जोरामुळे आज ती हे वाद्य यशस्वीपणे वाजवत असल्याचे बालनने सांगितले आहे. तसेच लक्ष्मीला हळूहळू प्रशिक्षण देण्याच्या प्रयत्नामुळे आज हे साध्य झाले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif