Taimur's Competitor Memes: सैफिना पाठोपाठ विरूष्का ने बाळाची गूडन्यूज शेअर करताच नेटकर्‍यांमध्ये तैमुरच्या स्टारडम बद्दल उत्सुकता; शेअर केले मजेशीर मीम्स, जोक्स!

दरम्यान काही दिवसांपूर्वी करिना कपूर खानने देखील तिची प्रेगन्सी न्यूज शेअर केली आहे. त्यामुळे मीडीयाचं आकर्षण असलेला स्टार किड तैमुर अली खान (Taimur Ali Khan) वर देखील मजेशीर मिम्स बनवण्यात आले असून सध्या सोशल मीडीयामध्ये त्याची धूम आहे.

Taimur's Competitor Memes: सैफिना पाठोपाठ विरूष्का ने बाळाची गूडन्यूज शेअर करताच नेटकर्‍यांमध्ये तैमुरच्या स्टारडम बद्दल उत्सुकता; शेअर केले मजेशीर मीम्स, जोक्स!
Taimur's Competitor Memes | Photo Credits: Twitter

पावर कपल अशी ओळख असणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) आज त्यांच्या चाहत्यांसोबतगूड न्यूज शेअर केली आहे. दरम्यान लवकरच विरूष्का आई-बाबा होणार आहेत. विराट कोहलीने ट्विटरच्या माध्यमातून अनुष्का शर्माच्या प्रेगन्सीची खूषखबर शेअर करताना आम्ही लवकरच दोघांचे तीन होणार आहोत. बाळ जानेवारी 2021 मध्ये येणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान विरूष्काने गूड न्यूज शेअर करताच त्यांच्या चाहत्यांकडून, सहकलाकार, मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. नेटकर्‍यांनी देखील या गूडन्यूजवर मजेशीर मिम्स बनवले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी करिना कपूर खानने देखील तिची प्रेगन्सी न्यूज शेअर केली आहे. त्यामुळे मीडीयाचं आकर्षण असलेला स्टार किड तैमुर अली खान (Taimur Ali Khan)  वर देखील मजेशीर मिम्स बनवण्यात आले असून सध्या सोशल मीडीयामध्ये त्याची धूम आहे.

करिना कपूरचा लेक तैमुर जन्माला आल्यापासून मीडियामध्ये आणि प्रामुख्याने सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय आहे. त्याची प्रत्येक अ‍पडेट, त्याचे पॅपराझीसोबत असलेलं गोड कनेक्शन, त्याचे प्ले ग्राऊंड, सैफिनाच्या सेट्सवरील क्षण टिपण्यासाठी मीडीया उत्सुक असते. आता सैफिनाचं नवं बाळ आणि त्यापाठोपाठ विरूष्काचं बाळ यामुळे तैमुर पासून मीडियाचं लक्ष हटणार का? असा प्रश्न नेटकर्‍यांच्या मनात आला आहे. त्यावरूनच आता सोशल मीडियात तैमुर ट्रेंड होण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांनी तैमुरच्या रिअ‍ॅक्शनचे काही रंजित मिम्स बनवले आहेत. Anushka Sharma-Virat Kohli Announce Pregnancy: विराट कोहली-अनुष्का शर्माच्या 'गुड न्यूज' नंतर युजवेंद्र चहल, क्रिस गेलसह खेळाडूंकडून शुभेच्छांचा वर्षाव

विरूष्काच्या गूड न्यूजवर तैमुर मिम्स व्हायरल

काम खल्लास

लाईम लाईट जाणार

तैमुर रिक्शन?

तैमुरला कॉम्पिटिशन

आत्मनिर्भर तैमुर

दरम्यान सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमुर आता लवकरच मोठा भाऊ होणार आहे. काही दिवसांपूर्वीच करिना -सैफ यांच्या दुसर्‍या बाळाच्या बातम्या शेअर करण्यात आल्या आहे. आता त्यापाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील आई होणार आहे. विरूष्काचं हे पहिलं बाळ आहे.

(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2020 01:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).