Wheelchair बसून आली Swiggy Delivery Girl; घरून जेवण मागवणाऱ्या ग्राहकांला बसला धक्का

या फोटोवर लोक भर-भरून कमेंन्ट करत आहेत.

Swiggy Specially Abled Delivery Girl (PC - Twitter)

Swiggy Specially Abled Delivery Girl: 'इच्छा असेल तर मार्ग नक्की सूचतो' ही म्हण तुम्ही ऐकली असेलचं. डिलिव्हरी एजंट (Delivery Girl) म्हणून काम करणाऱ्या एका दिव्यांग महिलेने ही म्हण अखेर खरी ठरवली आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागते आणि घरी काही बनवावेसे वाटत नाही तेव्हा आपण घरात बसून जेवण ऑर्डर करतो. त्यानंतर, आपण डिलिव्हरी एजंटची वाट पाहतो. डिलिव्हरी एजंटनी शक्य तितक्या लवकर यावे आणि आपली ऑर्डर द्यावी, असं आपल्याला वाटतं. उशीर झाला की, काही लोक डिलिव्हरी एजंटला फोन करतात. सध्या सोशल मीडियावर एका दिव्यांग डिलिव्हरी एजंट महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवर लोक भर-भरून कमेंन्ट करत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, एक स्विगी सर्व्हिस टी-शर्ट घातलेली दिव्यांग महिला व्हीलचेअरवर (Wheelchair) बसून ग्राहकांच्या ऑडर्स देताना दिसत आहे. जगविंदर सिंग घुमान नावाच्या युजरने लिंक्डइनवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. छोट्या क्लिपमध्ये, स्विगी एजंट व्हीलचेअरवर अन्न वाटप करताना दिसत आहे. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्हाला ऑफिसला उशीर झाला, तर तुम्ही फालतू सबबी काढता. पण खरा नायक कठोर परिश्रम करतो आणि निमित्त करून दुर्लक्ष करतो.' (हेही वाचा - Viral Video: स्कूटी साफ करण्यासाठी तिरंग्याचा वापर करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांकडून अटक, पहा व्हिडिओ)

Swiggy Specially Abled Delivery Girl (PC - Social Media)

इंटरनेटवर लोकांनी दिल्या 'अशा' प्रतिक्रिया -

ही पोस्ट व्हायरल झाली असून त्यावर अनेक कमेंट्स येत आहेत. एका यूजरने कमेंट लिहिली, 'मी या महिलेचे खूप कौतुक करतो. बाकी सर्वजण खूप मेहनत करत आहेत, आम्ही कष्ट न करण्याचे कारण नाही.' दुसऱ्या युजरने म्हटले की, 'हे त्यांच्यासाठी आश्चर्यकारक आणि धाडसी आहे. स्विगीला सलाम, कारण त्यांनी त्यांना वेगळे मानले नाही.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, 'यातून लाखो लोकांना प्रेरणा मिळेल. जर एखाद्याच्या जीवनात काहीतरी करण्याची जिद्द आणि इच्छा असेल तर ते एक दिवस त्यांचा मार्ग शोधतील. या दिशेने कंपन्यांनी अधिक पुढाकार घेतला पाहिजे.'