उपासमारीमुळे त्याने खाल्लं रस्त्यावर पडलेल्या मृत जनावराचं मांस; पहा मन हेलावून टाकणारा व्हायरल व्हिडिओ
या लॉकडाऊनमध्ये अनेक मजूरांचे हाल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक मजूरांनी गावाकडची वाट धरली आहे. मजूर मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहे. लॉकडाऊन काळात मजूरांच्या होणाऱ्या हाल अपेष्ठांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातचं एका भूकेने व्याकूळ झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये अनेक मजूरांचे हाल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक मजूरांनी गावाकडची वाट धरली आहे. मजूर मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहे. लॉकडाऊन काळात मजूरांच्या होणाऱ्या हाल अपेष्ठांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातचं एका भूकेने व्याकूळ झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये रस्त्याने चालेली व्यक्ती चक्क रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचं मांस खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ राजस्थानमधील शाहपुरा येथील असल्याचं म्हटलं जात आहे. दिल्ली-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर या व्हिडिओची रेकॉर्डिंग करण्यात आली आहे. अनेकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. (हेही वाचा - मुंबई: कोरोनावर मात करून आलेल्या ASI किरण पवार यांचंं स्वागत टाळ्या, पुष्पवर्षावाने (Watch Video))
जयपूरमधील प्रद्युमन सिंह नरुका यांनी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला. प्रद्युमन यांनी या व्हिडिओ विषयी माहिती देताना सांगितलं की, मी दिल्लीला जात असताना या व्यक्तीला शाहपुरा येथे रस्त्यावर जनावराचं मांस खाताना पाहिलं. हे चित्र पाहून मी त्या व्यक्तीला जेवण दिलं.
दरम्यान, या व्हिडिओमध्ये देखील प्रद्युमन यांनी या व्यक्तीला आवाज देऊन खाण्यासाठी अन्न नाही का? असा प्रश्न विचारला आहे. तसेच रस्त्यावरचं मासं खाल्ल्याने मृत्यू होईल, असंही प्रद्युमन म्हणत आहेत. तसचं अशा प्रकारे कोणी रस्त्यावर उपाशी दिसल्यास मदत करा, असं आवाहनही प्रद्युमन यांनी केलं आहे.