Snakes Drinking Water: सापाला पाजले पाणी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

यात विषयाचे असे कोणतेच बंधन असत नाही आणि कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे देखील सांगता येत नाही. यात माणसं, प्राणी, पक्षी, नौसर्गिक घटना अशा नानाविध गोष्टींचा समावेश असतो. आताही असाच एक सापाचा व्हिडिओ व्हायरल (Snake Video) झाला आहे.

Snake Drinking Water | (Photo Credit - Twitter)

सोशल मीडियावर दररोज कोणता ना कोणता व्हिडिओ व्हायरल होतच असतो. यात विषयाचे असे कोणतेच बंधन असत नाही आणि कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे देखील सांगता येत नाही. यात माणसं, प्राणी, पक्षी, नौसर्गिक घटना अशा नानाविध गोष्टींचा समावेश असतो. आताही असाच एक सापाचा व्हिडिओ व्हायरल (Snake Video) झाला आहे. ज्यात एका सापाला बॉटलने पाणी पाजल्याचे पाहायला मिळते. दावा केला जात आहे की, हा साप किंग कोब्रा (King Cobra) प्रजातील आहे. लेटेस्टली मराठी व्हिडिओतील सापाच्या प्रजाती अथवा घटनेबाबत पुष्टी करत नाही.

किंग कोब्रा सापाचे एक खास वैशिष्ट सांगतले जाते ते असे की, एकदा का किंग कोब्रा डसला की तो डसलेल्या रुग्णाचा मृत्यू झालाच म्हणून समजा. अर्थात वेळीच उपचार घेतले तर रुग्ण वाचण्याची शक्यात कैकपटीने अधिक असते असे डॉक्टर सांगतात. त्यामुळे विषारी साप म्हटले की काही प्रमाणात लोकांचे डोळे विस्फारणे सहाजिकच आहे. पण, अशा या विषारी सापाला जर कोणी पाणी पाजले तर? आश्चर्य वाटेल की नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले तरी असे घडले आहे खरे. घडले आहे म्हणजे तसा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची आम्ही पुष्टी करत नसलो तरी आपण मात्र हा व्हिडिओ पाहू शकता. (हेही वाचा, Sangli: नागाच्या डोक्याचा मुका घेणाऱ्या तरुणाला वन विभागाकडून हिसका, सांगली येथील युवकाचा जीवघेणा स्टंट)

ट्विट

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की एक भलताच लांब किंग कोबरा जमीनीवर पसरला आहे. एक व्यक्ती आपल्या हातांनी त्याला पाठिमागे पकडले आहे. दुसरा व्यक्ती आपल्या हातालील बॉटलने त्याला पाणी पाजतो आहे. मात्र, सापाला पाणी पाजणाऱ्या या व्यक्ती काहीशा घाबरलेल्या दिसतात हे नक्की. या दृश्याचा काही लोक व्हिडिओही बनवत असल्याचे दिसते. आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत 40 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहून लोक मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत.