Shocking Video: क्रूरतेचा कळस! घरात काम करणाऱ्या मुलीला मालकिणीची मारहाण; लिफ्टमधून ओढत बाहेर घेऊन गेली, पहा CCTV फुटेज
लवकरच शेफालीला अटक होणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिताच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत.
नोएडाच्या (Noida) एका हायराईज सोसायटीमधून एका घरगुती मदतनीस महिलेला मालकिणीकडून मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. लिफ्टमध्ये ही घटना घडली असून, तिथे बसवलेल्या कॅमेऱ्यात ती कैद झाली आहे. व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक महिला घरात काम करणाऱ्या मदतनीसासोबत भांडत आहे व तिला मारत आहे. आता या पिडीत महिला मदतनीसाच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिचे मेडिकल करून आरोपी मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
घरगुती मदतनीसाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सेक्टर 120 मधील क्लियो काउंटी सोसायटीमधील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली कौल नावाची महिला या सोसायटीत राहते. तिने 24 तासांच्या करारावर अनिता या 20 वर्षीय मुलीला घरगुती कामासाठी ठेवले होते. परंतु शेफाली सतत अनिताशी भांडत असे. ती अनिताला रात्रंदिवस घरची कामे करायला लावत असे, यासह ती तिला मारहाणही करत असे.
अनिता जेव्हाही तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा शेफाली तिला मारहाण करून घरात कोंडून ठेवत असे. आता शेफाली अनिताला लिफ्टमध्ये मारहाण करत, तिला ओढत लिफ्टबाहेर घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज दिसत आहे की, अनिता लिफ्टमधून खाली जाण्याचा प्रयत्न करत आहे, तर शेफाली तिला पकडून जबरदस्तीने लिफ्टमधून बाहेर काढताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (हेही वाचा: पत्नीने गुटखा खाऊन व दारू पिऊन पतीला त्रास देणे ही क्रूरता; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय)
पीडित अनिताने फेज 3 पोलीस ठाण्यात जाऊन शेफालीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. लवकरच शेफालीला अटक होणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिताच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणाही आढळून आल्या आहेत.