Shocking! प्रेयसीने झोपेत असलेल्या प्रियकराचे कापले गुप्तांग, धोका दिल्याच्या संशयावरुन केले हे भयानक कृत्य
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

संशय माणसाला काय काय करायला लावेल याचा काही नेम नाही. संशयी किडा एकदा का कोणाच्या मनात आला तर तो दुस-यासाठी जीवघेणाही ठरू शकतो. नात्यात धोका मिळाल्यानंतर अशीच भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. ज्यात प्रेयसीने झोपेत असलेल्या आपल्या प्रियकराचे गुप्तांग (Private Part) कापले आहे. आपल्याला नात्यामध्ये धोका दिल्याच्या संशयावरुन या प्रेयसीने हे धक्कादायक पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. प्रियकर झोपलेला असताना स्वयंपाक घरातील कैचीने त्याचे गुप्तांग कापले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना चंगुआ देशातील आहे. पीडित इसम 52 वर्षाचा आहे आणि तो तीन मुलांचा बाप आहे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा तो वाइनमध्ये बुडवलेले चिकन नूडल्स खाऊन गाढ झोपला होता, तेव्हा त्याला कळलेच नाही की त्याच्यासोबत काय घडले ते... मात्र जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा ते भयंकर दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमिनीच सरकली.हेदेखील वाचा- Fact Check: गणपती सारखा चेहरा असणाऱ्या बाळाचा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल, जाणून घ्या सत्यता

रिपोर्टनुसार, प्रेयसीने आपल्या प्रियकराचे कापलेले पेनिस टॉयलेटमध्ये फेकले होते. ज्यामुळे त्याला ते परत जोडता येणार नाही. त्यानंतर तिने स्वत: पोलिसांना शरण जाऊन आपला गुन्हा कबूल केला. पीडित इसमाचे नाव हुआंग असे आहे. तर आरोपी प्रेयसीचे नाव फुंग असे आहे.

हुआंग रुग्णालयात दाखल असलून त्याचे रक्त थांबविण्यासाठी डॉक्टरांनी त्वरित त्याचे ऑपरेशन केले. डॉक्टरांनी सांगितले की, हुआंगचे 1.5 सेमीपर्यंत त्याचे पेनिस कापलेले होते. रुग्णालयाचे उपसंचालक चो चिह-चुंग ने डेली मेलला सांगितले की, पीडिताच्या जीवाला सध्या धोका नाही. तथापि तो एनेस्थेटिक्स मधून बाहेर आल्यानंतरही अतिशय वेदना सहन करत होता. मात्र तो पाणी पिऊ शकतो आणि खाऊ शकतो.