Sex Worker University: खास सेक्स वर्कर्ससाठी सुरु झालेले जगातील पहिले विद्यापीठ; XXX Influencers होण्यासाठी मिळणार शास्त्रशुद्ध शिक्षण, तेही मोफत
Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

सेक्स वर्कर्स (Sex Workers) साठी विद्यापीठ! या गोष्टीची कोणी कल्पनाही केली नसेल मात्र ही गोष्ट सत्यात उतरली आहे. आपल्याकडे सेक्स वर्कर्सना एका वेगळ्या नजरेने पाहिले जाते, मात्र OnlyFans सारख्या व्यासपीठांच्या भरभराटीमुळे व लोकप्रियतेमुळे सेक्स वर्कर्सना सुगीचे दिवस आले आहेत. आता ते एक यशस्वी XXX इंफ्लूएंसर (Adult Influencer) कसे व्हायचे हे शिकू शकणार आहेत. XXX Adult Influencers हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या या उद्योगामध्ये अनेक लोकप्रिय नावे सामील झाली आहेत. एकमेकांना स्पर्धा करण्यासाठी कोणाकडेही पुरेसा अनुभव नाही. मात्र एक करिअर म्हणून या गोष्टीचा विचार करणाऱ्या लोकांसाठी आता एक खास, याच क्षेत्रामधील शैक्षणिक संस्था असणार आहे. ही संस्था सेक्स इंफ्लूएंसर होण्यासाठी तुमचे कौशल्य विकसित करेल.

सेक्स वर्कर्ससाठी जगात पहिल्यांदाच नव्याने सुरू झालेली सेंट्रो युनिव्हर्सिटी (Centro University) ही अडल्ट इंडस्ट्रीमध्ये काम करू इच्छित असलेल्या लोकांना एक उत्तम इंफ्लूएंसर कसे व्हायचे हे शिकवीत आहे आणि तेही मोफत. इतकेच नाही तर तुमच्या चाहत्यांना तुमचा कंटेंट पाहण्यासाठी सदस्यत्व घेण्यास कसे भाग पाडायचे, सोशल मीडिया व्यवसायाची जाहिरात आणि मार्केटिंग कसे करायचे हे देखील इथे शिकवले जाणार आहे. CentroU या नावाने Adult Influencers साठी जगातील पहिले सेक्स वर्कर्स विद्यापीठ नुकतेच उघडलेले आहे. एक यशस्वी Adult Influencer कसे व्हावे हे शिकण्यासाठी सेक्स वर्कर्ससाठी हे विद्यापीठ तयार केले गेले आहे. दिवसेंदिवस OnlyFans साठीची पसंती वाढत असताना, अनेक Adult Influencer हे क्षेत्र आपले करिअर म्हणून निवडत आहेत व त्यांच्यासाठी हे विद्यापीठ उपयुक्त ठरू शकेल.

ज्या लोकांना या क्षेत्रातील जास्त माहिती नाही किंवा अनुभव नाही अशांना आता, नव्याने सुरू झालेल्या Centro University मध्ये कोर्स करता येणार आहे. या क्षेत्रात सध्या अनेक Adult Influencers आहेत, अनेकांना या क्षेत्रामध्ये पाय ठेवायचा आहे किंवा जे लोक या क्षेत्रामध्ये आधीपासूनच आहेत त्यांना आपला बिझनेस वाढवायचा आहे. अशा सर्व लोकांना या विद्यापीठाचा फायदा होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे इथे मार्केटिंग आणि जाहिरात याचेही शिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी विद्यापीठाची FanCentro शी भागीदारी झाली आहे. FanCentro व्यासपीठ हे 2017 साली सुरु करण्यात आले होते. (हेही वाचा: सेक्स करण्याची पहिलीच वेळ असेल तर ट्राय करा या 'Superhot' पोजिशन्स)

विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे की, 'अभ्यासाच्या प्रत्येक कोर्समध्ये व्हिडिओ क्लासेस आणि लाईव्ह स्ट्रीमिंग विशेष अभ्यासक्रमांचा समावेश आहे. आमचे शिक्षक मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी उपलब्ध असतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील.’ सेक्स वर्कर्सना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे या विद्यापीठाचे उद्दिष्ट आहे.