Sex Championship: स्वीडनमध्ये सेक्सला 'खेळ' म्हणून मान्यता; 8 जूनला होणार पहिली युरोपियन 'सेक्स चॅम्पियनशिप', Massage, Oral Sex, Penetration सह 16 विषयांचा समावेश
येत्या 8 जून 2023 पासून गोटेनबर्ग येथे ही सेक्स चॅम्पियनशिप सुरु होणार.
आपल्या देशात सेक्सबद्दल (Sex) बोलणे हे अजूनही टॅबू मानले जाते. येथे तरुण लोकही त्यांच्या सेक्स लाईफबद्दल उघडपणे बोलण्यास कचरतात. दुसरीकडे स्वीडन (Sweden) देशामध्ये सेक्स चॅम्पियनशिप (Sex Championship) होऊ घातली आहे. स्वीडन हा एक असा देश आहे जिथे वृद्ध लोकही सेक्समध्ये बरेच सक्रीय आहेत. स्वीडनमध्ये सेक्स फेस्टिव्हलही साजरा होतो. आता स्वीडन देशाल सेक्स हा एक खेळ म्हणून समजला गेला आहे. अशात स्वीडन पहिल्या युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे यजमानपद भूषण्यासाठी सज्ज झाला आहे.
सेक्सला एका खेळ म्हणून ओळखणारा स्वीडन हा पहिला देश बनला आहे. स्वीडिश सेक्स फेडरेशन सेक्स चॅम्पियनशिपचे कार्यक्रमाचे आयोजन करेल. युरोपियन सेक्स चॅम्पियनशिप 8 जून, 2023 रोजी सुरू होईल व ती अनेक आठवडे चालेल. यामध्ये दररोज सहा तास स्पर्धा करणारे स्पर्धक सहभागी असतील. या स्पर्धेत सहभागींना त्यांच्या संबंधित सामने किंवा क्रियाकलापांमध्ये व्यस्त राहण्यासाठी अंदाजे 45 मिनिटे ते एक तास असेल. अहवालानुसार, आतापर्यंत विविध देशांतील 20 स्पर्धकांनी युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपसाठी अर्ज केले आहेत.
युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे विजेते पाच ज्युरी आणि प्रेक्षक रेटिंगच्या संयोजनाद्वारे निर्धारित केले जातील. अंतिम मूल्यांकनादरम्यान, प्रेक्षकांच्या 70% मतांचा विचार केला जाईल, तर उर्वरित 30% निकाल न्यायाधीशांच्या मतांमधून येईल. सेक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रलोभन, शरीराच्या विविध भागांची मालिश, ओरल सेक्स, संभोग, विविध पोझेसमध्ये सेक्स, संभोगाची संख्या व त्यातील कलात्मक कामगिरी, सर्वात सुंदर आणि कठीण पोझ अशा अनेक 16 विषयांचा समावेश आहे. ही स्पर्धा तीन टप्प्यात आयोजित केली जाईल.
स्वीडिश फेडरेशन ऑफ सेक्सचे अध्यक्ष, ड्रॅगन ब्रॅटिच, असे मानतात की सेक्सला खेळात बदलणे अपरिहार्य होते, कारण ही गोष्ट मानसिक आणि शारीरिक कल्याणास प्रोत्साहन देते. अपेक्षित परिणाम साध्य करण्यासाठी त्यांनी सहभागींना प्रशिक्षण देण्याच्या महत्त्वावर भर दिला. या खेळात आनंद महत्त्वाची भूमिका बजावेल व प्रतिस्पर्ध्याच्या आनंदाचा थेट स्कोअरवर परिणाम होईल. (हेही वाचा: Sex and Pleasure: सेक्स आणि लैंगिक सुखाचा परमोच्च क्षण म्हणजे काय?)
स्वीडिश सेक्स फेडरेशन नमूद केले की, एक खेळ म्हणून सेक्ससाठी सर्जनशीलता, तीव्र भावना, कल्पनाशक्ती, शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि कामगिरी आवश्यक आहे. येत्या 8 जून 2023 पासून गोटेनबर्ग येथे ही सेक्स चॅम्पियनशिप सुरु होणार, ज्यामध्ये विविध युरोपीय देशांतील सहभागी आहेत.