Sex Act In Plane: प्रवासादरम्यान जोडप्याचा सुटला ताबा, विमानात सेक्स केल्याचा व्हिडिओ झाला व्हायरल
प्रतीकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

शारीरिक संबंध असणे हे दोन लोकांचा खाजगी आणि जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून ते जोडपे एकटे असताना करण्यात येते. मात्र अशा अनेक लज्जास्पद घटनाही समोर आल्या आहेत, जेव्हा अनेक जोडपी कोणाचीही पर्वा न करता सार्वजनिकरित्या सेक्स करताना पकडले गेले आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जेथे एक जोडपे हवाई प्रवासादरम्यान स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाही आणि इतर प्रवाशांसमोर सेक्स करू लागले. या लज्जास्पद घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक जोडपं (Ryanair Flight) फ्लाइटमध्ये हवाई प्रवासादरम्यान लैंगिक कृत्य करताना दिसले. त्याची ही कृती पाहून इतर प्रवाशांना धक्का बसला. आणि विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडिओ बनवला. (Condom Removal Without Permission: Sex दरम्यान पार्टनरच्या परवानगी शिवाय कंडोम काढणे म्हणजे अपराध, 'या' देशाने काढला नियम )

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिला प्रवासी तिच्या पुरुष साथीदाराच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. फ्लाइटच्या आत दोघेही लैंगिक कृतीत इतके मग्न होते की त्यांना कोणाचीही पर्वा नव्हती . कोणी त्यांना पहात असेल याची पर्वा न करता, दोघेही एकमेकांमध्ये हरवलेले दिसत होते. या जोडप्याचे हे कृत्य विमानातील इतर प्रवाशांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. क्लिप शेअर करताना, अॅलन व्हाईट नावाच्या वापरकर्त्याने कॅप्शन लिहिले - 'फेयर प्ले टू @Ryanair हे परवानगी देत आहे. माझ्या पुढील फ्लाइटचे बुकिंग करताना मी हे लक्षात ठेवेन'. दुसरीकडे, एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ''या प्रकारानंतर त्या जोडप्यावर कारवाई झाली की नाही?''

रायनएअरच्या उड्डाण नियमांनुसार, प्रवाशांच्या अशा वर्तवणुकीनंतर त्यांना उतरवले जाऊ शकते. यासह, विमानातील असे वर्तन शिष्टाचार, अश्लील किंवा घृणास्पद मानले जाते.