Rasode Me kon Tha Kokilaben Video: रसोडे मे कौन था व्हिडिओ वर ओरिजनल कोकिलाबेन म्हणजेच रुपल पटेल यांंनी दिली 'ही' रिएक्शन

रसोडे मे कौन था (Rasode Me Kon Tha) व्हिडिओ व्हायरल झाल्यावर ओरिजनल कोकिलाबेन म्हणजेच रुपल पटेल यांंनी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Rasode Me kon Tha Kokilaben Viral Video (Photo Credits: Instagram)

साथ निभाना साथिया (Saath Nibhana Sathiya) मालिकेतील सर्व पात्र म्हणजेच कोकिलाबेन (Kokilaben),  गोपी बहु (Gopi Bahu), राशी (Rashi Ben) सध्या काही दिवसांपासुन सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहेत, तुम्हाला सुद्धा यामागचं कारण माहितचंं असेल. युट्युबर,गायक यशराज मुखाते (Yashraj Mukhate) याने मालिकेतील एका सीनचा म्युझिकल व्हिडिओ बनवुन आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरुन शेअर केला होता आणि हा व्हिडिओ नेटकर्‍यांंच्या इतका पसंतीस आला की आता सोशल मीडिया उघडलंं तरी पहिल्या दहा पोस्ट्स कोकिलाबेन आणि गोपी बहुच्या या रसोडे मे कौन था (Rasode Me Kon Tha) व्हिडिओ च्या असतात. मालिका संंपुन बराच अवधी उलटुन गेला असताना अशा प्रकारे मीम्स मधुन प्रेक्षकांंसमोर येण्याबाबत ओरिजनल कोकिलाबेन म्हणजेच अभिनेत्री रुपल पटेल (Rupal Patel) यांंना काय वाटतेय हे आज आपण जाणुन घेणार आहोत. अलिकडेच रुपल यांंनी टाईम्स ला दिलेल्या मुलाखतीत या व्हिडिओ विषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रूपल पटेल म्हणतात की, माझ्या मेव्हण्याने मला या गाण्याच्या व्हिडिओ पाठवला होता, त्याच्या नंंतर सह अभिनेत्री रिया शर्माने सुद्धा मला हाच व्हिडिओ पाठवला, सुरुवातीला मला याचं आश्चर्य वाटलंं, यशराज ला ही क्लिप कशी मिळाली, माझा आवाज गाताना कसा ऐकु येतोय मला काहीच कळत नव्हतंं,पण जेव्हा हा एक रॅप व्हिडिओ असल्याचं समजलंं मला खुपच हसु आलंं,मी यशराजशी सुद्धा बोलुन त्याला व्हिडिओ आवडल्याचंं कळवलं, अशा प्रकारे पात्र जेव्हा प्रेक्षकांंच्या लक्षात राहतात तेव्हा समाधान वाटतं, कोकिलाबेन हे पात्र माझ्यासाठी खुपच खास आहे आणि आता त्यावर व्हायरल होणारे मीम्स मी खुप एंजॉय करतेय".

कोकिलाबेन रसोडे मे कोन था व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

First World Problems • Made Kokila Ben sing this time • I love doing harmonies, enjoyed this one a lot • Kahi share karoge toh credits zaroor dena. Aapke pyaar ke liye bohot saara dhanyawaad!♥️♥️♥️ #dialoguewithbeats #kokilaben #gopibahu #rashi #cooker #saathnibhanasaathiya #yashrajmukhate #ymstudios

A post shared by Yashraj Mukhate (@yashrajmukhate) on

दरम्यान, यशराज मुखाते याने यापुर्वी सुद्धा असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. मुळ औरंगाबाद चा हा अवलिया कलाकार आता या कोकिलाबेनच्या व्हिडिओ मुळे कमाल प्रसिद्ध झाला आहे. दुसरी कडे रुपल या सध्या ये रिश्ते हैं प्यार के में या मालिकेत दिसत आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now