Couple Challenge वरून पुणे पोलिसांचा नेटकर्‍यांना सावध राहण्याचा सल्ला; 'सायबर क्राईम'चा धोका दाखवत हे 'खपल चॅलेंज' होण्याची व्यक्त केली भीती

Couple Challenge चा बोलबाला आहे. यामध्ये जोडपी आपल्या साथीदारासोबतचा फोटो पोस्ट करत आहेत. पण या लव्ही डव्ही चॅलेंजमध्ये सायबर क्राईमचा देखील धोका आहे. पुणे पोलिसांनी नेटकर्‍यांना हाच धोका लक्षात आणून देत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहे.

Pune Police | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या संकटकाळामध्ये लॉकडाऊनचा वेळ घालवण्यासाठी नेटकर्‍यांनी चॅलेंजेस सुरू केली होती. मज्जा मस्तीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत कधी जुने तर कधी नवे फोटो क्लिक करत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियामध्ये Couple Challenge चा बोलबाला आहे. यामध्ये जोडपी आपल्या साथीदारासोबतचा फोटो पोस्ट करत आहेत. पण या लव्ही डव्ही चॅलेंजमध्ये सायबर क्राईमचा देखील धोका आहे. पुणे पोलिसांनी नेटकर्‍यांना हाच धोका लक्षात आणून देत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहे. Couple Challenge on Social Media: कपल चॅलेंजवर सिंगल्स कडून भन्नाट मीम्स आणि जोक्स शेअर! (See Post).  

ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट करताना पुणे पोलिसांनी इशारा दिला आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चँलेंज न करो, केला तर कपलचा खपल चँलेंज होईल'. यावेळीच त्यांनी फोटोचा गैर फायदा घेत मॉर्फिंग करून ते पॉर्न साईट साठी किंवा इतर चूकीच्या गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात असं म्हणत सावध रहा असे म्हटले आहे.

पुणे पोलिस ट्वीट

कपल चॅलेंजची नेमकी सुरूवात कुठून आणि कशी झाली याची काही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतू सध्या लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसला कंटाळलेल्या अनेकांनी सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या या रोमॅन्टिक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र तुमचे फोटो सुरक्षित ठेवा. त्याचा गैरफायदा होत नाही ना? याची काळजी घ्या.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now