PUBG Ban Funny Memes and Jokes: सरकारकडून पबजी गेमवर बंदी घातल्याने Twitterati वर पालकांनी व्यक्त केला आनंद तर युजर्सच्या चेहऱ्यावरील नाराजी दाखवणारे मजेशीर मेम्स व्हायरल

Pubg ban memes (Photo Credits: Twitter)

माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने सोशल मीडियातील 118 अॅपवर बंदी घातली आहे. यामध्ये PlayerUnknown's Battlegrounds किंवा PUBG याचा सुद्धा यामध्ये समावेश आहे. तर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन मध्ये सीमेवर सुरु असलेल्या तणावाचे हे परिणाम आहेत. यापूर्वी सरकारने जून महिन्यात TikTok अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यावेळी सुद्धा पबजी गेमवर बंदी घालण्यात येणार की नाही याबद्दल संभ्रम कायम होता. तसेच आतापर्यंत युजर्सला हा गेम खेळण्यासाठी उपलब्ध करुन दिला जात होता. मात्र आता सरकारकडून 118 अॅपवर बंदी घातली असून त्यात पबजी सुद्धा समावेश आहे.(नागपूर: पबजी गेममध्ये हरला म्हणून इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या)

सरकारकडून पबजी खेळावर बंदी घालण्यात आल्यानंतर मेम्स आणि जोक्सचा सोशल मीडियात पाऊस पडत आहे. तर ज्या युजर्संना पबजी गेम खेळणे आवडायचे त्यांनी नाराजी तर काहींनी आनंद व्यक्त केला आहे. #Pubg ट्विटरवर ट्रेन्ड होत असून नागरिकांकडून त्यांच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत. एकीकडे पालक खुश तर दुसऱ्या बाजूला युजर्सची नाराजी असे मिम्स आणि जोक्स व्हायरल झाले आहेत.(PUBG Among 118 Chinese Apps Banned: भारतात पबजी, लूडो गेमसह 118 मोबाईल ऍप्सवर बंदी; पाहा संपूर्ण यादी)

118 अॅपमध्ये Photo Gallery HD & Editor, WeChat Work & WeChat, Gallery Vault- Hide Pictures and Videos, AppLock, AppLock Lite, Gallery HD, Web Browser, Baidu, Camcard Business, FaceUसह TikTok चा समावेश आहे. या अॅप संबंधित काही तक्रारी सुद्धा समोर आल्या आहेत. तर युजर्सचा खासगी डेटा चोरला जात असल्यासारखे प्रकार समोर आले होते. टिकटॉकनंतर अन्य 47 अॅपवर जुलै महिन्यात बंदी घालण्यात आली होती. तर पबजीवर अखेर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान, तुम्ही आणि तुमचे मित्र मंडळी पबजी गेम खेळत असल्यास त्यांना हे मजेशीर मेम्स आणि जोक्स शेअर करुन तुमचा आनंद आणि दुख व्यक्त करा.  तर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 69 अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.