National Unemployment Day: पंतप्रधान मोदी यांचा बर्थडे ‘राष्ट्रीय बेरोजगार दिन’ म्हणून साजरा करा, विरोधी पक्षांचे अवाहन
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकार विरोधात जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विविध मुद्द्यांवरुन राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मालिकाच सुरु केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची ध्येयधोरणे त्यातच आलेले कोरना व्हायरस (Coronavirus) संकट, घ्यावा लागलेला लॉकडाऊन (Lockdown) या सर्वांचा परिपाक देशाच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. देशातील बेरोजगारी, मगाहाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जाडीपी (GDP) घरसरला आहे. त्यामुळे विरोधक कमालिचे आक्रमक झाले आहेत. आक्रमक झालेल्या विरोधकांनी भाजपला टोला लगावत येत्या 17 संप्टेंबरला 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' (National Unemployment Day) साजरा करावा असे अवाहन केले आहे. सोशल मीडियावरही 'राष्ट्रीय बेरोजगार दिन' (National Unemployment Day 2020) हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. हा हॅशटॅग वापरुन अनेक युजर्स आपली प्रतिक्रिया देत आहेत. उल्लेखनीय असे की, 17 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. हा दिवस भाजपने ‘सेवा सप्ताह’ सप्ताह म्हणून साजरा करण्याचे घोषीत केले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी आगोदरच (सोमवार, 14 सप्टेंबर) घोषणा केली आहे की, पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. सेवा सप्ताहानिमित्त अन्नदान मास्क, सॅनिटायझर आणि औषध वाटप करण्याचा भाजपचा विचार आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा 70 वा वाढदिवस आहे. त्यामुळे 70 ठिकाणी हा कार्यक्रम करण्याचा मनोदय भाजपने व्यक्त केला आहे. (हेही वाचा, PM Narendra Modi Birthday: पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांंच्या 70 व्या वाढदिवसनिमित्त भाजपचा आजपासुन सेवा सप्ताह, 'असंं' होणार सेलिब्रेशन)
ट्विट
दरम्यान, #NoMoreBJP #बेरोजगार_सप्ताह हे हॅशटॅग ट्विटरवर सोमावारी ट्रेंड होताना दिसले. गेल्याही वर्षी पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस भाजपने मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. या वेळीही भाजपने हा वाढदिवस मोठ्या प्रमाणावर साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, बिहारमधील सुलेह देव समाज पार्टीचे प्रमुख पियुष मिश्रा यांनी मात्र ट्विटरवरुन अवाहन केले आहे की, 17 सप्टेंबर हा ‘बेरोजगारी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
ट्विट
ट्विट
घसरलेला जीडीपी, बेरोजगारी, महागाई या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाचा प्रमुख आणि मोठा विरोधक काँग्रेस पक्षही आक्रमक आहे. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनीही केंद्र सरकार विरोधात जोरदार टीकास्त्र सोडले आहे. विविध मुद्द्यांवरुन राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ मालिकाच सुरु केली आहे.