Nude Video Viral: पाकिस्तानी गायिका रबी पीरजादाचे अश्लील फोटो-व्हिडीओ व्हायरल; मदतीला धावले ट्विटर

सध्या रबीचे कथित अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या अनेक ट्विटर हँडल्सवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केली गेली आहेत.

रबी पीरजादा (Photo Credits: Instagram)

पाकिस्तानी पॉप-गायिका रबी पीरजादा (Rabi Peerzada) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सध्या रबीचे कथित अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. पाकिस्तानच्या अनेक ट्विटर हँडल्सवर हे फोटो आणि व्हिडिओ शेअर केली गेली आहेत. हे पाहता ट्विटरनेही वापरकर्त्यांना असे न करण्याचा इशारा दिला आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ आणि फोटो शेअर केल्यास त्यांचे खाते ब्लॉक होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे. पाकिस्तान टुडेच्या वृत्तानुसार, या गायिकेचा व्हिडिओ गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हजारो वापरकर्त्यांनी तो शेअर केला. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबाबत कोणतीही पुष्टी नाही. दरम्यान, याबाबत पीरजादा हिने एफआयए (तपास यंत्रणा) च्या सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधला आहे.

अनेक ट्वीटमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राबीचा पाकिस्तान लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ घफूर यांच्याशी वाद होता त्यामुळे हे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘आयटम साँगला बचाव करण्यासाठी घाफूरवर टीका केल्यानंतरच रबीचा व्हिडिओ समोर आला आहे.’ या घटनेसंदर्भात लष्कराच्या प्रवक्त्यावर संशय आहे. तसेच, अनेक लोकांचे म्हणणे आहे की, पीरजादाच्या जुन्या प्रियकराने हे व्हिडिओ लिक केले आहेत.

(हेही वाचा: हातात अजगर, शेजारी मगर घेऊन भडकली पाकिस्तानी गायिका Rabi Pirzada; भारतीय आणि पीएम नरेंद्र मोदींना दिली साप हल्ल्याची धमकी (Video))

'काफ कंगना' चित्रपटातील नीलम मुनीरच्या आयटम डान्सचा बचाव करण्यासाठी राबीने आसिफ गफूरवर टीका केली होती. या आयटम साँगला ऑनलाईन ट्रोलही केले गेले होते, कारण यात भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला गेला होता. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राबीने एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती साप, मगर अशा भयानक प्राण्यांशी खेळताना दिसत आहे. हे सर्व प्राणी पंतप्रधान मोदींसाठी खास भेटवस्तू आहेत असे तिचे म्हणणे होते. त्यावेळीही राबी प्रचंड ट्रोल झाली होती.