लोकप्रिय Google डूडल गेम: गुगलचा प्रसिद्ध 'Coding' गेम खेळा आणि घरीच रहा
कोडिंग ही सीरिज खासकरुन लहान मुलांसाठी बनवण्यात आली असून त्याला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.
सोशल मीडियावरील जगप्रसिद्ध सर्च इंजिन असलेले गुगल (Google) नेहमीच डुडलच्या माध्यमातून एक संदेश देण्याचा प्रयत्न करतात. याच दरम्यान जगभरातील नागरिकांवर, परिवारावर आणि सर्वत्र कोरोनाचे संकट आलेले पहायला मिळत आहे. तर सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाउनमुळे नागरिक घरात अडकून पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता गुगलने या सर्व गोष्टी उत्तम बनवण्यासाठी त्यांची यापूर्वीची डुडलची एक सीरिज लॉन्च केली आहे. त्यामध्ये गुगलचे काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय गेम डुडल्स गेम लोकांना खेळता येणार आहेत. या डुडल गेम मधील पहिली सीरिज ही 2017 मधील असून ;कोडिंग' (Coding) असे त्याचे नाव आहे. कोडिंग ही सीरिज खासकरुन लहान मुलांसाठी बनवण्यात आली असून त्याला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत.
गुगल डुडल मधील कोडिंगच्या सीरिज मध्ये एक ससा दिसून येत आहे. तसेच त्याच्या पुढे गाजर असून त्याला ते आवडत असल्याने त्याला ते मिळवून देण्यासाठी काही सुचना दिल्या जातात. त्यानुसार आपण सश्याला पुढे, पाठी किंवा बाजूला वळण्यास मदत केल्यास ते गाजर खाता येणार आहे. अशा पद्धतीचा हा एकूणच गेम असून सध्याच्या लॉकडाउनच्या काळात लहानमुलांसह मोठ्यांचे पण मनोरंजन करणारा ठरेल. तर कोडिंग नंतरचे सुद्धा गेम गुगल युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे दर्शवले जात आहे.(कोरोना विषाणू: Covid 19 संकटात किराणा सामान पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांचे Thank You Coronavirus Helpers म्हणत गुगलने साकारले खास डूडल!)
दरम्यान, वसुंधरा दिनाच्या वेळी सुद्धा गुगलने एक खास डुडल तयार केले होते. त्यामध्ये पृथ्वी दिनाला 50 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांनी एका खास शैलीतील डूडल सादर करत त्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या.पण त्याचबरोबर गुगलने या दिनानिमित्त पृथ्वीवरील छोटा पण पर्यावरण संरक्षणात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावणा-या मधमाशांसाठी समर्पित केला आहे. यासाठी गुगलने खास व्हिडिओ बनविला आहे जो मधमाशांचे महत्व सांगणारा होता.