PIB Fact Check: 3 मे पर्यंत सर्व मोबाईल युजर्सना मिळणार मोफत इंटरनेट सेवा? जाणून घ्या व्हायरल मॅसेज मागील सत्य
लॉक डाऊन संपेपर्यंत म्हणजेच 3 मे पर्यंत सर्व मोबाईल युजर्सना भारत दूरसंचार विभागातर्फे मोफत इंटरनेट सेवा पुरवण्यात येईल असा दावा केला जातो हा दावा फोल असून यात काहीही तथ्य नाही असे PIB कडून सांगण्यात आले आहे.
कोरोना व्हायरसला (Coronavirus) रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी 3 मे पर्यंत देशभरात लॉक डाऊन (lockdown) घोषित केले आहे. या दरम्यान नागरिकांना सोयिच्या काही सेवा सुविधा मोफत किंवा अल्पदरात देण्याचा प्रयत्न सरकार व सामाजिक संस्थांच्या तर्फे केला जातोय. अलीकडे जीवनावश्यक गोष्टींच्या यादीत महत्वाचे स्थान प्राप्त केलेल्या इंटरनेट सेवांच्या बाबतही मोफत सेवा दिली जाणार आहे अशा चर्चा सध्या रंगत आहेत. या संदर्भातील काही मॅसेज सुद्धा व्हाट्सऍप सहित सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल (Viral Forwards) होत आहेत. मात्र यावर भाष्य करत, PIB इंडियाने हे मॅसेज खोटे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. व्हायरल मेसेजच्या नुसार, लॉक डाऊन संपेपर्यंत म्हणजेच 3 मे पर्यंत सर्व मोबाईल युजर्सना भारत दूरसंचार विभागातर्फे मोफत इंटरनेट सेवा पुरवण्यात येईल असा दावा केला जातो हा दावा फोल असून यात काहीही तथ्य नाही असे PIB कडून सांगण्यात आले आहे. PIB Fact Check: भारत सरकार प्रत्येक गावामध्ये हेलिकॉप्टरच्या माध्यामातून पैशांची बरसात करणार? जाणून घ्या या FAKE News मागील सत्य
काय आहे हा व्हायरल मॅसेज?
कोरोना महामारीच्या संकटकाळात सरकारतर्फे घोषित करण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये सर्व मोबाईल वापरकर्त्यांना भारत दूरसंचार निगम तर्फे मोफत इंटरनेट डेटा मिळणार आहे ,ही सोय केवळ 3 मे पर्यंत उपलब्ध असेल असे या मॅसेज मध्ये लिहिण्यात आले आहे. तसेच यासाठी एक लिंक दिलेली असून त्यावर क्लिक करून ही सेवा ऍक्टिव्हेट करा असेही सांगण्यात आले आहे.
काय आहे सत्य?
PIB ने सांगितल्याप्रमाणे हा दावा सपशेल खोटा आहे, भारत दूरसंचार विभागाने असा कोणताही निर्णय घेतलेला नसून संबंधित मॅसेज मध्ये फिरणारी लिंक ही सुद्धा नकली आहे. यांच्या बळी पडू नका.
पहा ट्विट
दरम्यान, लॉक डाऊन काळात घरबसल्या अनेक मंडळी असेच मॅसेज विना पडताळणी करता फॉरवर्ड करत आहेत, मात्र असे करणे सर्वांसाठीच धोक्याचे ठरू शकते. ऑनलाईन फ्रॉडच्या जाळयात तुम्हाला फसायचे नसल्यास अशा मॅसेजेस बाबत त्वरित पोलिसांच्या सायबर सेलला माहिती कळवत जा. तसेच कुटुंब, मित्रपरिवार यांच्यातही कोणी असे मॅसेज पसरवत असेल तर त्यांना समज द्या.