PIB Fact Check: Omicron च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचार्यांंचा DA, DR लांबणीवर? जाणून घ्या वायरल मेसेज मागील सत्य
सध्या Ministry of Finance च्या नावाने खोटा मेसेज पसरवला जात आहे. त्यामध्ये महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्यात आल्याचा दावा खोटा असल्यानं त्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सोशल मीडीयामध्ये सध्या एक पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सरकारने ओमिक्रॉन वायरस (Omicron Variant) दहशतीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचार्यांचा डीए (DA), डीआर (DR) लांबणीवर टाकल्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई भत्त्यामध्ये वाढ केली जाते. त्यामुळे यंदाही 1 जानेवारीला वाढ होणं अपेक्षित आहे. परंतू अद्याप घोषणा झालेली नाही. पीआयबी कडून या व्हायरल लेटरवर स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
पीआयबीच्या ट्वीटनुसार व्हायरल मेसेज खोटा आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता लांबणीवर टाकण्याचा कोणताही निर्णय प्रसिद्ध केलेला नाही. सध्या Ministry of Finance च्या नावाने खोटा मेसेज पसरवला जात आहे. त्यामध्ये महागाई भत्त्यातील वाढ स्थगित करण्यात आल्याचा दावा खोटा असल्यानं त्यावर विश्वास न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे देखील नक्की वाचा: 7th Pay Commission: नवीन वर्षात 'या' कर्मचाऱ्यांच्या पगारात 95,000 पर्यंत होऊ शकते वाढ, वाचा सविस्तर .
ट्वीट
सध्या डीए 31% आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये Ministry of Finance ने 28% वरून महागाई भत्ता 31% केला आहे. नवा महागाई दर 1 जुलै 2021 पासून लागू करण्यात आले आहेत. जुलै 2021 मध्ये डीए 17 वरून 28% करण्यात आला होता. हिंदूच्या रिपोर्ट्सनुसार, 47.14 लाख कर्मचारी आणि 68.62 लाख लोक लाभार्थी होत आहेत.