PIB Fact Check: सरकारी निधी, नोकरी, प्रमाणपत्र यांबाबतचे सोशल मीडियांवरील अनेक दावे खोटे, पीआयबीच्या तथ्य पडताळणीत वस्तुस्थिती समोर

या पडताळणीत सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक दावे खोटे असल्याचे पुढे येते आहे. आताही पीआयबीने फॅक्ट चेक (PIB Fact Check) करत असेच काहीसे दावे खोडून काढले आहेत.

PIB Fact Check | (Photo Credit - Twitter)

सरकारी नोकरी (Government Jobs), केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, मदत अथवा इतर काही माहितींबाबत सोशल मीडिया आणि इंटरनेटवरुन रोज काही ना काही माहिती सातत्याने पुढे येत असते. कधी कधी प्रसारमाध्यमेही अशा प्रकारची माहिती देतात. सर्वसामान्य माणूस अशा महितींवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण असा विश्वास ठेवण्यापूर्वी सावधान. नागरिकांच्या अनभिज्ञतेचा फायदा घेऊन अनेकांना फसवणुकीच्या जाळ्यात अडकवले जात आहे. सोशल मीडिया (Social Media) आणि अनेक वेबासईटवरुन केल्या जाणाऱ्या दाव्याची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (Press Information Bureau) अर्थातच पीआयबी (PIB) अनेकदा पडताळणी करत असते. या पडताळणीत सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक दावे खोटे असल्याचे पुढे येते आहे. आताही पीआयबीने फॅक्ट चेक (PIB Fact Check) करत असेच काहीसे दावे खोडून काढले आहेत. त्यामुळे तुम्हालाही सोशल मीडियावर काही मेसेज आले असतील तर ते दावे पीआयबीने खोडून तर काढले नाहीत ना? याची फॅक्ट चेक तपासून पाहा.

भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून आज रात्री बारा वाजता सर्व टेलीग्राम ग्रुप्सआणि चॅनेलची चौकशी केली जाणार, असा मेसेज तुम्हाला आला आहे का? किंवा तुमच्या वाचण्यात, पाहण्यात आला आहे का? असे असेल तर सावधान. हा मेसेज खोटा आहे. स्वत: पीआयबीने याबाबत खुलासा केला आहे. केंद्र सरकारने अशा प्रकारचा कोणताच निर्णय केला नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. (हेही वाचा, PIB Fact Check: Indian Railways मध्ये 5 वर्षांखालील मुलांचेही आता पूर्ण तिकीट घ्यावे लागणार? पहा वायरल खोट्या वृत्तामागील सत्य)

ट्विटर हँडल @Bsfindia0 या नावाचे ट्विटर हँडल तुम्ही अधिकृत मानत आहात का? तसे असेल तर तुम्ही चुकता आहात. कारण हे अकाऊंट फेक आहे. त्यामुळे त्यावरुन देण्यात येणाऱ्या चुकीच्या माहितीला योग्य मानू नका अथवा गृहित धरु नका. सीमा सुरक्षा दल म्हणजेच बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (Border Security Force) चे अधिकृत ट्विटर अकाऊट @BSF_India असे आहे. त्यामुळे माहितीची वास्तवता तपासत चला, असे अवाहन पीआयबी करते.

एमएसएमई उद्यम (MSME)नावाने एक वेबसाईट दावा करत आहे की, प्रिंटींग आणि रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रासाठी ते 2700 रुपये आकारतात. पण ही असा कोणताच आकार आकारला जात नाही. अशा प्रकारे दावा करणारी बेबसाईटच मुळात बोगस आहे. उद्यम रजिस्ट्रेशनची अधिकृत वेबसाईट ही https://udyamregistration.gov.in अशीआहे.

ट्विट

एका व्हायरल मेसेजमध्ये दावा करण्यात येत आहे की, पंतप्रदान ज्ञानवीर योजनेंतर्गत सर्व युवकांना 3400 रुपे प्रति महिने मिळणार आहेत. मी तर या योजनेचा लाभ घेतला आहे. आपणही प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेच्या माध्यमातून हा निधी मिळवू शकता. त्यासाठी नोंदणी करा, असे अवाहनही या मेसेजद्वारे करण्यात येत आहे. परंतू, पीआयबीने पडताळणी करत म्हटले आहे की, केंद्र सरकार अशा प्रकारे कोणतीही रक्कम कोणालाही देत नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊन कोणीही आपली खासगी माहिती कोणालाही शेअर करु नये.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif