PIB Fact Check: दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा नाही या वायरल WhatsApp Message मागील सत्य पीआयबी कडून उघड; पहा सत्य काय
तसेच शिक्षण मंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडीया हे दुधारी शस्त्र आहे. अनेकदा यावर खोट्या बातम्या जास्त वेगाने वायरल होत असतात. तथ्य न तपासता आपणही त्यावर विश्वास ठेवतो किंवा इतरांना ती फॉर्वर्ड करतो त्यामुळे कळतनकळत खोटी वृत्त पसरावायला कळत नकळत हातभार लागतो. सध्या दहावीच्या परीक्षेबाबतही अशीच काही खोडसाळ वृत्त वायरल होत आहे. त्यापैकी व्हॉट्सअॅपवर मागील काही दिवसांत वायरल झालेले वृत्त म्हणजे नव्या शिक्षण धोरणानुसार (New Education Policy) आता दहावीच्या बोर्ड परीक्षा (Class 10 Board Exam) होणार नाही.
वायरल मेसेजमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने New Education Policy अर्थात नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली असून आता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा द्यावी लागणार नाही केवळ 12वीचे विद्यार्थी बोर्ड परीक्षा देतील. या मेसेज मध्येच आता एम फिल प्रोग्राम देखील बंद करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र पीआयबी फॅक्ट चेक कडून हे दावे खोडून काढण्यात आले आहेत. त्यांनी ट्वीट करत हे वृत्त खोटं असल्याचं सांगितलं आहे.
पीआयबीने ट्वीट करत वायरल होत असलेला मेसेज शेअर करत हा खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच शिक्षण मंत्रालयाकडून असा कोणताही निर्णय अद्याप झाला नसल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: National Education Policy 2020: नव्या शैक्षणिक धोरणास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी; कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर.
मागील दीड दोन वर्ष कोरोना संकटामुळे शिक्षणाचे तीन-तेरा वाजले आहेत. त्यामध्ये यंदाही कोरोनाच्या सावटाखालीच विद्यार्थी राज्यात बोर्ड परीक्षेला सामोरे जाणार आहेत. सीबीएसी, आयसीएससी बोर्डाने यंदा बोर्ड परीक्षा दोन टर्ममध्ये विभागून घेतली आहे. तर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून ऑफलाईन परीक्षा परंपरेनुसार एकदाच होणार आहे. येत्या काही दिवसांत 10,12वीच्या परीक्षेला सुरूवात होणार आहे.