Viral Video: 'आम्ही मेन्टेनन्स देतो' म्हणत प्रवाशाने मुंबई लोकल ट्रेनच्या खिडकीतून फेकलं गुटख्याचे पाकीट; व्हायरल व्हिडिओवर रेल्वे विभागाने दिला 'असा' प्रतिसाद

त्याचे कृत्य रेकॉर्ड करणारी व्यक्ती, एक सहप्रवासी, स्टेशनवर गुटख्याचे पाकीट फेकल्याबद्दल त्याची चौकशी करताना दिसतो. तेव्हा तो व्यक्ती उद्धटपणे उत्तर देतो की, तो स्टेशन स्वच्छ करण्यासाठी मेंटेनन्स देतो, त्यामुळे ही रेल्वेची जबाबदारी आहे.

Passenger throws Gutkha wallet from window of Local (PC - X/Sick mentality)

Viral Video In Mumbai Local Train: मुंबईच्या लाइफलाइन, लोकल ट्रेनमधून (Mumbai Local) एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती थांबलेल्या लोकल ट्रेनमधून स्टेशनवर गुटख्याचे पाकीट फेकण्यावरून दुसऱ्या प्रवाशाशी वाद घालताना दिसत आहे. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्यक्तीच्या कृतीने अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. रेल्वे विभागाने X वरील रेल्वे सेवेच्या अधिकृत हँडलवरून या व्हायरल झालेल्या व्हिडिओला प्रतिसाद दिला आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हा व्यक्ती लोकल ट्रेनच्या खिडकीतून गुटख्याचे पाकीट टाकून देताना दिसत आहे. त्याचे कृत्य रेकॉर्ड करणारी व्यक्ती, एक सहप्रवासी, स्टेशनवर गुटख्याचे पाकीट फेकल्याबद्दल त्याची चौकशी करताना दिसतो. तेव्हा तो व्यक्ती उद्धटपणे उत्तर देतो की, तो स्टेशन स्वच्छ करण्यासाठी मेंटेनन्स देतो, त्यामुळे ही रेल्वेची जबाबदारी आहे. (हेही वाचा -Viral Video: सीट न मिळाल्याने ट्रेनच्या खिडकीच्या काचा फोडल्या, व्हिडिओ व्हायरल)

व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती पुढे म्हणते की, त्याच्या या कृत्यासाठी त्याला पुरस्कार द्यावा, ज्याला तो व्यक्ती "होय, मला पुरस्कार द्या" असे उत्तर देताना दिसतो. हे संभाषण पुढे प्रवाश्यांच्या दरम्यान शाब्दिक भांडणापर्यंत पोहोचते. (वाचा - Women Group Danced in Delhi Metro: एवढचं पाहायचं राहिलं होतं! दिल्ली मेट्रोमध्ये महिलांचा ग्रुप डान्स, पहा व्हायरल व्हिडिओ)

व्हायरल व्हिडिओवर रेल्वेची प्रतिक्रिया

हा व्हिडिओ X वर अनेक व्यक्तींनी अपलोड केला होता, ज्यात भारतीय रेल्वे, रेल्वे मंत्री आणि इतर अधिकाऱ्यांना टॅग करून प्रवाशांचे अनियंत्रित कृत्य त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. रेल्वे सेवेच्या अधिकृत हँडलने व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेतली आणि X वापरकर्त्याच्या व्हिडिओ पोस्टपैकी एकाला प्रतिसाद दिला.

रेल्वे विभागाने या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'आम्ही हे पाहण्यासाठी चिंतित आहोत आणि लवकरात लवकर मदत करू इच्छितो. आम्हाला शक्यतो DM द्वारे तुमचा ट्रेन क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. तुम्ही तुमची चिंता थेट http://railmadad.indianrailways.gov.in वर देखील मांडू शकता किंवा जलद निवारणासाठी 139 डायल करा - RPF इंडिया."