लॉकडाऊन काळात Parle-G बिस्किटची 8 दशकांतील सर्वाधिक विक्री; नेटिझन्सने सोशल मिडियाच्या माध्यमातून निर्मात्यांवर कौतुकाचा वर्षाव
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी साठी सर्वोत्कृष्ट बिझनेस झाला असून गेल्या 8 दशकांत असे पहिल्यांदाच घडले आहे.
लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंद्यांना उतरती कळा लागली आहे. Lockdown अनेक कंपन्यांचे उत्पन्न शून्यावर आले असून काहींनी तर कंपन्या बंद सुद्धा केल्या आहेत. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र पार्ले-जी (Parle-G)कंपनीने एक वेगळाच विक्रम केला आहे. लॉकडाऊनच्या काळात पार्ले-जी बिस्किट ची 8 दशकातील सर्वाधिक विक्री झाल्याचे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे. याचाच अर्थ या कंपनीला लॉकडाऊनचा फटका न बसता चांगलाच फायदा झाल्याचे दिसत आहे. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी साठी सर्वोत्कृष्ट बिझनेस झाला असून गेल्या 8 दशकांत असे पहिल्यांदाच घडले आहे.
इतकच काय तर पार्ले-जी च्या उत्तम विक्री मुळे या कंपनीचे शेअर्स ही 5% नी वाढले आहे. पार्ले-जी बिस्किट च्या जबरदस्त विक्रीमुळे कंपनीचे उत्पन्न 80 ते 90 टक्के वाढले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात कंपनीने 5 रुपयाच्या किंमतीत मिळणा-या पार्लेजी बिस्किटवर सर्वाधिक लक्ष दिले आहे. Coronavirus Lockdown: 'डी मार्ट'चे मालक राधाकृष्ण दमानी यांच्या संपत्तीत वाढ; भारतातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मिळवले दुसरे स्थान
नेटिजन्स हटके अंदाजात व्यक्त केल्या Parle-G बद्दलच्या भावना:
अभिनेता रणदीप हुडा चे ट्विट:
लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजूरांनी आपल्या गावचा रस्ता धरला. अनेक मजूर तर बेरोजगार झाले. अशा स्थितीत त्यांना 5 रुपयाला मिळणारे पार्ले बिस्किट परवडण्यासारखे होते. त्याचबरोबर अशा गरजूंना मदत करणा-या अनेक लोकांनी मोठ्या प्रमाणात पार्लेजी बिस्किट खरेदी केली आणि ही 5 रुपयांचे पॅकेट गरजूंमध्ये वाटले. त्यामुळे याचाही आम्हाला भरपूर फायदा झाला असे कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले आहे.