Panty Stealer Caught: महिलांची अंतवस्रे चोरी करण्याची सवय पडली महागात, व्यक्तीवर केली 'ही' कारवाई
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File image)

Panty Stealer Caught: एम्बू कोर्टाने महिलांचे अंतवस्र चोरी केल्यापेरकरणी एका व्यक्तीला 80 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचसोबत वर्षभर तुरुंगाची शिक्षा सुद्धा सुनावली आहे. आरोपी पायस मुंगेडी याने गेल्या वर्षात 28 मे रोजी काउंटीच्या मिकिम्बी गावात अंडरवेअर चोरी करण्यास कोर्टात नकार दिला. कोर्टाने कागदपत्रांनुसार असे म्हटले की, मुंगेडी हा जूलियट माविया नावाच्या महिलेच्या इमारतीत घुसला आणि त्यांने 1500 रुपयांच्या सहा पॅटी चोरी केल्या. मावियाने पुराव्याच्या आधारावर कोर्टाला म्हटले की,एक कपडा सकाळी तीन वाजता खिडकीच्या येथे पडला होता. तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला उठवले.

सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर रात्री अकराच्या सुमारास कोणीतरी इमारतीत घुसल्याचे दिसले. आम्ही कोणीतरी वायर्ड इनरवेअर उचलताना आणि हिरव्या कागदाची पिशवी घेऊन जाताना पाहिले. तेव्हा आरोपीने सीसीटीव्हीच्या नजरेतून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तो त्यात कैद झाला,' असे माविया म्हणाली. त्यांनी कोर्टाला सांगितले की पाऊस पडला होता आणि ते आरोपीच्या घरापर्यंत त्याच्या पावलांचे ठसे घेत त्याच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत होते. त्याला ती 20 वर्षांहून अधिक काळ ओळखत होती, कारण ते शेजारी राहत होते.(OnlyFans Porn: जॉब सोडून जोडप्याने 'ओन्ली फॅन्स’वर Sex Video बनवायला केली सुरुवात; महिन्याची कमाई ऐकून बसेल धक्का)

पुरावे आणि प्रत्यक्षदर्शीच्या आधारे कोर्टाने आरोपीला दोषी ठरविले. पण आपण कथितपणे काहीही केले नाही आणि तक्रारकर्त्याने आपल्या कपाळावर दुस-याचा गुन्हा मारल्याचे म्हटले. पत्नी आणि मुले आहेत आणि मी न्यायालयाकडे दयाळूपणासाठी प्रार्थना करतो ," असे म्हणत मुगेंडी याने शिक्षा कमी करण्यासाठी विनंती केली.

एम्बूचे वरिष्ठ निवासी दंडाधिकारी जुलियाना एनडेंगरी यांनी त्यांच्या निकालात म्हटले की, न्यायालयाने शिक्षा कमी करण्याचा विचार केला. "त्याला पश्चात्ताप झाला असून त्याने निंदनीय आणि घृणास्पद कृत्ये केली होती. तर न्यायालयाने त्याला 80,000 रुपये दंड ठोठावला आणि त्याला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली,"