Man Climbs High-Tension Electric Tower: नोएडातील व्यक्तीने हाय टेंशन इलेक्ट्रिक टावरवर चढून केला डान्स; तब्बल 2 तास सुरू होता हायव्होल्टेज ड्रामा (Watch Video)
दुपारी मिस्त्री नावाच्या मद्यधुंद मध्यमवयीन व्यक्तीने हाय टेन्शन लाईनवरून सुमारे शंभर फूट वर चढून नाचण्यास सुरुवात केली. हे पाहून आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली. सुमारे दोन तास हा ड्रामा सुरू होता.
Man Climbs High-Tension Electric Tower: उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर 78 मध्ये रविवारी एका अज्ञात व्यक्तीने हाय-टेंशन इलेक्ट्रिक टॉवरवर चढून सुमारे दोन तासांच्या हाय व्होल्टेज ड्रामा केला. प्राप्त माहितीनुसार, हा तरुण दारूच्या नशेत होता. पोलीस, अग्निशमन दल आणि वाहतूक पोलीसांच्या जवळपास दोन तासांच्या प्रयत्नानंतर हा तरुण झाली आला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस स्टेशन 113 अंतर्गत येणाऱ्या सेक्टर 78 मधील महागण मझरिया सोसायटीसमोरून हाय टेंशन टावर आहे. दुपारी मिस्त्री नावाच्या मद्यधुंद मध्यमवयीन व्यक्तीने हाय टेन्शन लाईनवरून सुमारे शंभर फूट वर चढून नाचण्यास सुरुवात केली. हे पाहून आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी झाली. सुमारे दोन तास हा ड्रामा सुरू होता.
दोन तास चालला हाय व्होल्टेज ड्रामा -
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलीसही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मद्यधुंद व्यक्तीला खाली उतरण्याची विनंती केली. यावेळी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तब्बल दोन तास हा हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. सर्वजण त्याला खाली उतरण्याचा आग्रह करत राहिले. दरम्यान, अग्निशमन दलाने वीजवाहिनी कापली. तसेच विशेष हायड्रोलिक मशीनला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मद्यधुंद व्यक्ती खाली पडू नये, यासाठी टावरच्याभोवती जाळी लावण्यात आली होती. अखेर दोन तासांनंतर मद्यधुंद व्यक्ती खाली आला. (Karnataka Building Collapse: कोलारच्या बांगारापेट शहरात नूतनीकरणादरम्यान 3 मजली इमारत कोसळली; कोणतीही जीवितहानी नाही (Watch Video))
नोएडातील व्यक्तीने हाय टेंशन इलेक्ट्रिक टावरवर चढून केला डान्स, पहा व्हिडिओ -
नोएडाचे मुख्य अग्निशमन अधिकारी (सीएफओ) प्रदीप कुमार चौबे यांनी घटनास्थळी मीडियाला सांगितले की, दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर मिस्त्री नावाचा व्यक्ती स्वतःहून खाली उतरला. अग्निशमन विभागाने जाळीच्या साहाय्याने त्याला सुखरूप खाली उतरवून रुग्णालयात पाठवले. हा व्यक्ती खांबावर का चढला याचे कारण अद्याप समोर आले नाही. तो मानसिक रुग्ण असल्याचे दिसून येत आहे. तो जवळच एका झोपडीत राहतो, असे स्थानिक लोकांनी सांगितले.