Naziha Salim Google Doodle: इराकी चित्रकार नजीहा सलीम यांच्या कार्याला गूगलचा डूडल द्वारा सलाम

नजीहा सलीमची कलाकृती शारजाह आर्ट म्युझियम आणि मॉडर्न आर्ट इराकी आर्काइव्हमध्ये आज झळकत आहे.

Naziha Salim

आज 23 एप्रिल दिवशी गूगलच्या (Google) होमपेजवर जगातील आघाडीच्या सर्च इंजिनने आपल्या आजच्या गूगल डूडल (Google Doodle) द्वारा नजीहा सलीम (Naziha Salim) यांना आदरांजली दिली आहे. नजीहा सलीम या इराकच्या प्रभावी कलाकार, चित्रकार आणि प्राध्यापिका होत्या. आपल्या चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण इराणी महिलांचं वास्तव अनेकदा मांडलं आहे.

नजीहा सलीम यांचा जन्म टर्कीत इराणी कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील चित्रकार आणि आई निष्णात एम्ब्रॉडरी आर्टिस्ट होती. तर त्यांचे तिन्ही भाऊ आर्ट्स मध्येच काम करत होते. इराकचा प्रसिद्ध शिल्पकार Jawad देखील नजिहा यांचा भाऊ आहे. सुरूवातीपासूनच नजिहा यांना कलेवर प्रेम होतं आणि त्या यामध्ये रमत होत्या.

Salim ने Baghdad Fine Arts Institute मध्ये प्रवेश घेतला जिथे तिने चित्रकलेचा अभ्यास केला आणि डिस्टिंक्शनसह पदवी प्राप्त केली. तिच्या कठोर परिश्रमामुळे आणि कलेची आवड यामुळे ती पॅरिसमध्ये École Nationale Supérieure des Beaux-Arts मध्ये शिक्षण सुरू ठेवण्यासाठी शिष्यवृत्ती मिळविलेल्या पहिल्या महिलांपैकी एक होती.

पॅरिसमध्ये असताना सलीमने फ्रेस्को आणि भित्तीचित्रकलेमध्ये विशेष प्राविण्य मिळवले. ग्रॅज्युएशननंतर, तिने परदेशात आणखी काही वर्षे घालवली, कला आणि संस्कृतीत स्वत: ला समर्पित केले. नंतर बगदाद मध्ये Fine Arts Institute मध्ये निवृत्तीपर्यंत अध्यापन करण्याचा निर्णय तिने घेतला. हे देखील नक्की वाचा: Rosa Bonheur Google Doodle: फ्रेंच अ‍ॅनिमल पेंटर रोसा बॉनहर यांच्या 200 व्या जयंती निमित्त गूगलचं खास डूडल .

नजीहा सलीमची कलाकृती शारजाह आर्ट म्युझियम आणि मॉडर्न आर्ट इराकी आर्काइव्हमध्ये आज झळकत आहे.