BMC Cleanup Marshal Viral Video: मुंबईच्या सांताक्रुझ भागात मास्क न घातलेल्या प्रवाशाकडून दंड वसूलीसाठी मार्शल चालत्या कारच्या बोनेटला बिलगला; व्हिडिओ वायरल

त्यासाठी नाक्यानाक्यावर पालिकेचे मार्शल तैनात आहेत.

BMC Cleanup Marshal Viral Video । PC: Twitter/ @mohsinofficail (Screengrab From Video)

सध्या सोशल मीडीयामध्ये मुंबई (Mumbai) मध्ये एक क्लिन अप मार्शल (Cleanup Marshal) एका चालत्या गाडीच्या बोनेट वरून जात असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट नुसार या मार्शलचं नाव सुरेश पवार आहे. हा प्रकार मुंबई मध्ये बुधवारी घडला आहे. पवार हा सांताक्रुझ पूर्व भागात हनुमान टेकडी परिसरात राहतो. मागील 2 वर्ष तो मार्शल म्हणून काम करत आहे पण असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता असं तो म्हणाला आहे.

बुधवारी संध्याकाळी ऑन ड्युटी असताना सांताक्रुझच्या हंस भुंग्रा सिग्नलवर (Hans Bhugra Signal) एका कॅब मध्ये त्याला एक महिला विना मास्क प्रवास करताना दिसली. तिला बीएमसीच्या नियमाप्रमाणे 200 रूपये फाईन भरायला सांगितला ती तयार देखील झाली पण कॅब ड्रायव्हर हुज्जत घालायला लागला. त्याने गाडी सुरू केली. त्याला गाडी बाजूला घेण्याची विनंती देखील धुडकावून लावली. असे पवार सांगतो. (नक्की वाचा: मुंबई: ट्रॅफिक मध्ये नवरा बायकोचा ड्रामा; पतीला कार मध्ये दुसऱ्या गर्लफ्रेंड सोबत बघून गाडीवर चढली पत्नी (Watch Video)).

बीएमसी मार्शलचा वायरल व्हिडिओ

पवार यांनी गाडी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा कॅब ड्रायव्हरने गाडी सुरू केल्याने पवार गाडीच्या बोनेट वर आडवा झाला. नशीबाने त्याला दुखापत झाली नाही पण कॅब ड्रायव्हारच्या वागणूकीमुळे तो हादरला होता.

सांताक्रुझ परिसरात हा प्रकार सुरू असताना रस्त्यावर एका बाईकस्वाराने सारा प्रकार कॅमेर्‍यामध्ये टिपला. त्याचा व्हिडिओ सध्या वायरल होत आहे.