कोविड 19 च्या विरोधातील टेस्ट पासून जिंकण्यासाठी मास्क घालण्याचे मुंबई पोलिसांचे आवाहन, क्रिकेटच्या सामन्यांचे उदाहरण देत केले 'हे' खास ट्विट
कोविड19 च्या विरोधातील टेस्ट पासून जिंकण्यासाठी मास्क घालण्याचे मुंबई पोलिसांनी अनोख्या पद्धतीने आवाहन करत क्रिकेट सामन्यांचे उदाहरण देऊन हे ट्वीट केले आहे.
मुंबई पोलिसांचे सोशल पोस्ट ची नेहमीच चर्चा होताना पहायला मिळत असते. मुंबई पोलिस नेहमीच ऐसे काही ट्वीट शेअर करत असतात ज्यात जनजागृती तर होतेच पण ते ही विनोदी आणि अनोख्या पद्धतीने.हल्लीच मुंबई पोलिसांनी हात धुण्यासंदर्भात अग्निपथ सिनेमातील सीन शेअर करत ट्वीट केले होते. आज असेच एक अनोख्या पद्धतीने ट्वीट मुंबई पोलिसांच्या सोशल मीडियावर ट्वीट करण्यात आले आहे. मास्क घालण्यासंबधी जनजागृती करण्यारे हे ट्वीट आहे. (Mumbai Police: मुंबई पोलीसांनी Agneepath चित्रपटातील Video शेअर करत नागरिकांना केले हात धुण्याचे अवाहन)
कोविड19 च्या विरोधातील टेस्ट पासून जिंकण्यासाठी मास्क घालण्याचे मुंबई पोलिसांनी अनोख्या पद्धतीने आवाहन करत क्रिकेट सामन्यांचे उदाहरण देऊन हे ट्वीट केले आहे.'Day or night, wear a mask to win the 'Test' against the virus' असे मुंबई पोलिसांनी या ट्वीट मध्ये लिहिले आहे.
मुंबई पोलिस नेहमीच अशा अनोख्या पद्धतीने नागरिकांना आवाहन करत असते. त्यामुळे हे ट्वीट जास्तीत जास्त शेअर ही केले जातात.हे संदेश केवळ सामाजिकच नसतात तर कलात्मक आणि तितकेच मनोरंजकही असतात.