Raksha Bandhan 2022: Tinder वर मुंबईकर तरूणाने रक्षाबंधन साजरा करण्यासाठी शोधल्या 2 बहिणी; Reddit Post वायरल

Tinder या डेटिंग अ‍ॅप वर त्याने बहिणींचा शोध घेण्यासाठी पोस्ट टाकली. आणि त्याला दोन बहिणी मिळाल्या देखील असं म्हटलं आहे.

Tinder App (Photo Credits-Twitter)

रक्षा बंधनाचा (Rakshabandhan)  सण आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. बहिण-भावाच्या नात्याला जपणारा हा सण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो. पण एका बहीण नसलेल्या तरूणाने चक्क रक्षाबंधनाला आपल्यालाही बहीण असावी यासाठी लढवलेली शक्कल चर्चेचा विषय बनली आहे. मुंबईकर भावाने Reddit वर एक पोस्ट केली होती. त्यामध्ये Tinder या डेटिंग अ‍ॅप वर त्याने बहिणींचा शोध घेण्यासाठी पोस्ट टाकली. आणि त्याला दोन बहिणी मिळाल्या देखील असं म्हटलं आहे. दोन दिवसांत त्याच्या सोशल मीडीया पोस्ट्ला 500 अपव्होट्स मिळाले आणि अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केला आहे.  नक्की वाचा: Tinder युजर्ससाठी मोठी बातमी; आता या Dating App वर Ex, नातेवाईक अथवा ओळखीच्या कोणाला दिसणार नाही तुमची प्रोफाईल, आले नवे फिचर .

Reddit वर या तरूणाने केलेल्या पोस्ट मध्ये त्याने 'रक्षाबंधनाला आपल्याला बहीण नसल्याने 'FOMO'येत असल्याचं म्हटलं आहे. मला कुणी राखी बांधायला नव्हतं ना मी कुणाला गिफ्ट द्यायला. मागील दोन वर्षांपासून रक्षाबंधनाच्या 2 आठवडा आधी मी बायो मध्ये "Looking for a sister to hangout during Rakshabandhan".असे टाकत होतो. यंदा टिंडर वर मला दोन बहिणी मिळाल्या आहे. यंदा आम्ही तिघं रक्षाबंधनाच्या निमित्त एकत्र भेटून हा दिवस साजरा करणार आहोत. एकमेकांना गिफ्ट्सही देणार आहोत. हे देखील नक्की वाचा: Raksha Bandhan 2022 Dos and Don’ts:भाद्र कालावधी आणि पूजा विधीपासून ते पुजेची ताट आणि आरतीपर्यंत, रक्षाबंधन साजरे करताना लक्षात ठेवा 6 महत्वाच्या गोष्टी, जाणून घ्या संपूर्ण माहिती .

टिंडर हे एक डेटिंग अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर तरूणाई Date शोधत असतात. जून महिन्यात केरळच्या एका युजर्सने Bumble या डेटिंग अ‍ॅप वर मुंबईत फ्लॅट्स शोधल्याने त्याची देखील चर्चा झाली होती. एका ट्वीटर युजर ने त्याच्या प्रोफाईलचा स्क्रीन शॉर्ट शेअर केला होता. हिंदी नीट बोलता येत नसल्याने मुंबईत घर शोधण्यामध्ये अडचणी येत असल्याचं त्याने सांगितलं होतं.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now