मुंबई मध्ये Eastern Express Highway बहरला Pink Trumpet Trees ने ; पहा चेरी ब्लॉसमच्या नजार्याचे फोटो, व्हिडिओ
गुलाबाप्रमाणे याचा रंग असल्याने त्याचा Rosea मध्ये समावेश केला जातो.
भारतामधून अनेक जण खास जपान, लंडनमध्ये चेरी ब्लॉसम सीझनचा आनंद लुटण्यासाठी हमखास ट्रीप्स प्लॅन करतात. पण यंदा कोविड 19 संकट आणि आंतरराष्ट्रीय प्रवासावरील बंदी पाहता अनेकांची यंदा ही संधी हुकली असेल. पण जर तुम्ही सध्या मुंबई मध्ये असाल तर ईस्टन एक्सप्रेस वे वर तुम्हांला खुलेली गुलाबी trumpet trees नक्की पाहता येतील. घाटकोपर, विक्रोळी परिसरात हलक्या गुलाबी रंगाची छटा असलेल्या फुलांनी बहरलेली ही झाडं अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ऐरवी मुंबई ट्राफिकने वैतागलेले अनेक जण हे दृश्य आपल्या कॅमेर्यामध्ये टिपत आहेत. हमखास थांबून फोटो काढत असल्याचं चित्र सध्या ईस्टन एक्सप्रेस हायवे वर आहे. सोशल मीडियामध्येही त्याचे अनेक फोटो, व्हिडिओ वायरल झाले आहेत.
ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वर असलेल्या या स्थानिक झाडांना वैज्ञानिक भाषेत Tabebuia म्हटलं जातं. गुलाबाप्रमाणे याचा रंग असल्याने त्याचा Rosea मध्ये समावेश केला जातो. पण सामान्य माणसांसाठी सध्याच्या क्रॉंकिटच्या जंगलात हे चेरी ब्लॉसमचं दृश्य अल्हायदायक आहे.
ईस्टर्न एक्सप्रेस वे
मुंबईचा नजारा
चेरी ब्लॉसमचा नजारा
मुंबईमध्ये एरवी गर्दी आणि ट्राफिकमध्ये अडकल्यानंतर होणारी चिडचिड टाळण्यासाठी सध्या हे चित्र फार सुखद आहे. दरम्यान टोलेजंग इमारती आणि गजबजपुरी मध्ये हे चित्र आनंददायी आहे.