मुंबई: डोंबिवलीकर घरबसल्या करत आहेत लोकल ट्रेन प्रवासाचा सराव; व्हिडिओ पाहून तुम्हालाही आठवतील जुने दिवस (Video)

या लॉकडाऊनने लोकल ट्रेनमांडून प्रवास करणाऱ्यांची मात्र सवय मोडली आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. या सर्वांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात काही नागरिक मात्र एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे घरी लोकल ट्रेनमधून प्रवासाचा सराव करत आहेत.

डोंबिवलीकर घरबसल्या करत आहेत लोकल ट्रेन प्रवासाचा सराव (Photo Credit: Twitter)

कोरोना व्हायरसमुळे सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊन कायम आहे ज्यामुळे नागरिक घरी बसण्यासाठी मजबूत आहेत. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबई, ठाणेसह कल्याण-डोंबिवलीतही (Kalyan-Dombivali) लॉकडाऊन करण्यात आले आहे. या लॉकडाऊनने लोकल ट्रेनमांडून प्रवास करणाऱ्यांची मात्र सवय मोडली आहे हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मुंबईमध्ये (Mumbai) कामासाठी जाण्यासाठी दररोज लाखो नागरिक लोकल ट्रेनचा वापर करतात. तथापि, लॉकडाऊनमुळे सध्या स्थिती बदलली आहे. पण या सर्वांमध्ये सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात काही नागरिक मात्र एका आगळ्या-वेगळ्या प्रकारे घरी लोकल ट्रेनमधून (Local Train) प्रवासाचा सराव करत आहेत. हा व्हिडिओ इतका भन्नाट आहे की पाहून दररोज लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या लोकानांही आपले जुने दिवस आठवतील. (Watch Video: कोरोनावर मात करुन आलेल्या मोठ्या बहिणीचे धाकटीकडून दणक्यात स्वागत; सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवर कौतूकाचा वर्षाव)

या व्हिडिओची रेकॉर्डिंग एका घरात करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला एक मुलगी खिडकी जवळ बसलेली दिसत आहे. या खिडकीवर डोंबिवली असे दिसत आहे. पुढे ट्रेनचा दरवाजा म्हणून तीन पुरुष घराच्या दारावर उभे दिसत आहे.त्यानंतर काही बायका स्टेशन आल्यावर घरात (ट्रेनमध्ये चढतात) येतात. हा मजेदार व्हिडिओ ट्रेनमधून नियमितपणे प्रवास करणाऱ्याला त्यांच्या जुन्या दिवसाची आठवण करून देईल.

पाहा व्हिडिओ:

डोंबिवली येथे कोरोनाची परिस्थिती सध्या गंभीर बनली आहे. कल्याण-डोंबिवली नागरी संस्थेने संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत यशस्वी ठरलेल्या धारावी मॉडेलचे अनुसरणकल्याण-डोंबिवलीत करणार येण्याचे वृत्त समोर येत आहे. नागरीक शरीर एसीम्प्टोमॅटिव्ह रूग्णांसाठी डोर-टू-डोर स्क्रीनिंग आणि अँटीजेन टेस्ट करवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.