राजस्थान च्या जलोर जिल्ह्यात आकाशातून पडली धातूमय उल्का! सोशल मीडियावरील रहस्यमय वस्तूचे फोटो पाहून नेटीझन्स म्हणाले, हा तर एलियनचा मुखवटा; Watch Photos
जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असताना राजस्थानच्या (Rajasthan) जलोर जिल्ह्यात (Jalore District) आज सकाळी आकाशातून एक रहस्यमय वस्तू (Mysterious Object) पडली. ही वस्तू एक धातूमय उल्का (Metallic Meteorite) आहे. ज्याचे वजन जवळजवळ 2.8 किलो इतकं आहे. दरम्यान, ट्विटरवर या वस्तूचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. यातील काहींनी याला एलियनचा मुखवटा (Alien's Mask) म्हटलं आहे, तर काहींनी ही जादू असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्याप या रहस्यमय उल्का सारख्या दिसणाऱ्या वस्तूबद्दल काहीही समजू शकलेले नाही.
यंदा 2020 या वर्षातील प्रत्येक महिन्यात प्रत्येकाला आश्चर्यचकित करतील अशा घटना घडत आहेत. जगभरात कोरोना व्हायरसने (Coronavirus) धुमाकूळ घातला असताना राजस्थानच्या (Rajasthan) जलोर जिल्ह्यात (Jalore District) आज सकाळी आकाशातून एक रहस्यमय वस्तू (Mysterious Object) पडली. ही वस्तू एक धातूमय उल्का (Metallic Meteorite) आहे. ज्याचे वजन जवळजवळ 2.8 किलो इतकं आहे. दरम्यान, ट्विटरवर या वस्तूचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. हे फोटो पाहून नेटिझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. यातील काहींनी याला एलियनचा मुखवटा (Alien's Mask) म्हटलं आहे, तर काहींनी ही जादू असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्याप या रहस्यमय उल्का सारख्या दिसणाऱ्या वस्तूबद्दल काहीही समजू शकलेले नाही.
वृत्तानुसार, राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील गायत्री कॉलेज जवळील सांचोर येथे पहाटे 7 वाजता जोरदार आवाज ऐकू आला. यावेळी ही वस्तू पृथ्वीवर 4 ते 5 फूट खाली बुडाली. हा नेमका काय प्रकार आहे, ते पाहण्यासाठी स्थानिक लोक आजूबाजूला जमले. त्यानंतर पोलिसांची एक टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी ही वस्तू अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढली. त्यानंतर या धातूच्या वस्तूची संपूर्ण तपासणी केली गेली. यावेळी या वस्तूचे वजन सुमारे 2.78 किलो भरले. ही वस्तू जमिनीतून काढली त्यावेळी ती गरम होती. या वस्तूची तपासणी करण्यासाठी वैज्ञानिकांच्या एका टीमला बोलविण्यात आले आहे. या रहस्यमय काळ्या आणि चांदीच्या वस्तूचे फोटो ट्विटरवर शेअर केले गेले आहे. हे फोटो पाहून नेटीझन्स आश्चर्यचकित झाले आहेत. सोशल मीडियावर या वस्तूचे फोटो प्रंचड व्हायरल झाले आहेत. या फोटोवर नेटीझन्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या सर्व प्रतिक्रिया तुम्ही खालील ट्विटमध्ये पाहू शकता. (हेही वाचा - Coronavirus: या पठ्ठ्याचा Viral Video पाहून अनेकांचा कॉन्फिडन्स पातळ, म्हणे 'मी असताना तुम्ही घाबरु नका, नसताना घाबारा')
या वस्तूविषयी लोकांमध्ये कुतुहल निर्माण झालं आहे. ही वस्तू जर खरचं उल्का असेल तर वैज्ञानिकांसाठी हा एक आश्चर्यकारक शोध ठरणार आहे. दरम्यान, 11 फेब्रुवारी रोजी राजस्थानच्या अलवर भागात पहाटे 5.10 च्या सुमारास उल्कापाताची दुर्मिळ घटना घडली होती. योगायोगाने हा क्षण CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. अवकाशातुन तुटलेली ही उल्का जेव्हा कोसळली तेव्हा आसपासच्या परिसरात काही सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे आता राजस्थानच्या जलोर जिल्ह्यातील या रहस्यमय वस्तूविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.