लॉकडाऊनमुळे परदेशात अडलेल्या नागरिकांना परतण्यासाठी 'RESCUE FLIGHTS FROM INDIA' गूगल फॉर्म सोशल मीडियावर व्हायरल; PIB Fact Check सांगितले सत्य
तसंच त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रर झाला आहात असे सांगण्यात येत आहे. PIB ने या मेसेजची पडताळणी केली असून हा मेसेज फेक असल्याचे उघडकीस आले आहे.
कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे जगभरात विविध ठिकाणी भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना भारतात परत आणण्यासाठी 7 मे पासून खूप मोठे रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात येणार आहे. अशा मेसेज सह एक गुगल फॉर्मची लिंक सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. या गुगल फॉर्मचे टायटल "RESCUE FLIGHTS FROM INDIA" असे आहे. या मेसेजमध्ये सर्व रेक्स्यू फ्लाईट्सची यादी देण्यात आली आहे. या मेसेजमधून परदेशात अडकलेल्या भारतीयांना "RESCUE FLIGHTS FROM INDIA" या गुगल फॉर्ममध्ये माहिती भरण्यास सांगितले आहे. तसंच त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रर झाला आहात असे सांगण्यात येत आहे. PIB ने या मेसेजची पडताळणी केली असून हा मेसेज फेक असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे हा मेसेज त्याचबरोबर यातील सर्व लिंक्स फेक असल्याचे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे. परदेशातील भारतीयांनी अशा कोणत्याही प्रकारच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. त्याचबरोबर भारतीय एम्बेसीच्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती मिळवावी, असे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे.
या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये पीआयबीने म्हटले आहे की, "भारत सरकारने असा कोणत्याही प्रकारचा फॉर्म जारी केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकराच्या फेक लिंक्सवर क्लिक करु नये असे सांगत पीआयबीने नागरिकांना सतर्क केले आहे. त्याचबरोबर भारतात परतण्यासाठी भारतीय एम्बेसीच्या अधिकृत वेबसाईटवर जावून नागरिकांना रजिस्ट्रेशन करावे." (#MatKarForward: सारा अली खान, विराट कोहली, आयुष्यमान खुराना आणि कृति सेनन यांच्यासह PIB Fact Check चा टिकटॉक व्हिडिओ; फेक न्यूज फॉरवर्ड न करण्याचे नागरिकांना आवाहन)
PIB Fact Check Tweet:
सोशल मीडियाच्या विविध माध्यमांवर बऱ्याच फेक न्यूज आणि कोरोना व्हायरस विरुद्ध चुकीची माहिती पसरत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या खोट्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ट्विटर यावरुन समोर येणारी प्रत्येक माहिती खरी असेलच असे नाही. त्यामुळे माहितीची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्य मंत्रालय किंवा लेटेस्ली ला भेट द्या.