Viral Video: चालत्या ट्रेनसमोर इन्स्टाग्राम रील बनवणं 16 वर्षीय मुलाला पडलं महागात; ट्रेनच्या धडकेत गमवावा लागला जीव
या अल्पवयीन मुलाला रील बनवताना ट्रेनची धडक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.
Viral Video: लोक सोशल मीडियावर फॅन फॉलोइंग वाढविण्यासाठी अनेकदा मर्यादा ओलांडताना दिसतात. यासाठी काहीजण धोकादायक स्टंटही करतात. अनेकदा हे स्टंट जीवावर बेतल्याच्या आपण अनेक घटना पाहिल्या आहेत. हैद्राबादमधील (Hyderabad) एका तरुणाला चालत्या ट्रेनसमोर रील (Instagram Reel) बनवणं चांगलचं महागात पडलं आहे. या अल्पवयीन मुलाला रील बनवताना ट्रेनची धडक बसल्याने आपला जीव गमवावा लागला आहे.
शुक्रवारी हैदराबादमध्ये एका युवकाचा हाय स्पीड ट्रेनसमोर इंस्टाग्राम रीलच्या शूटिंगदरम्यान मृत्यू झाला आहे. इतत्ता नववीच्या इयत्तेतील 16 वर्षांचा विद्यार्थी मोहम्मद सरफराज यांचे सानत नगरमधील रेल्वे ट्रॅकवर ट्रेनने धडक दिल्याने निधन झाले. तो त्याच्या दोन मित्रांसह इन्स्टाग्राम रीलसाठी व्हिडिओ शूट करीत होता. (हेही वाचा - YouTuber Agastya Chauhan Death: लोकप्रिय युट्यूबर अगस्त्य चौहान याचा मृत्यू; ताशी 300 किमी वेगाने गाडी चालवतान झाला भीषण अप \घात)
ट्रेन येताना पाहिल्यानंतर सरफराझचे मित्र स्वत: ला वाचवण्यासाठी तेथून निघून गेले. पण सरफराजला ट्रेनने धडक दिली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.
दरम्यान, मृत मुलाच्या वडिलांनी सांगितले की, त्याने शुक्रवारी प्रार्थनेसाठी घर सोडले होते आणि काही तासांनंतर त्याचे दोन वर्गमित्र मुझम्मिल आणि सोहेल घरी आले. त्यानंतर त्यांनी आम्हाला घटनेची कल्पना दिली. जेव्हा ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांचा मुलगा मरण पावला होता. रेल्वे पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून मोबाइल फोन जप्त केला आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.