स्वतःच्या लघवीने धूत असे भांडी, घरात काम करणाऱ्या महिलेचा पराक्रम; CCTV कॅमेऱ्यामुळे किळसवाणा प्रकार उघडकीस (Video)

अशाप्रकारे घरात काम करणाऱ्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद (Ghaziabad) येथे, घरात काम करणार्‍या महिलेची (Maid) अशी एक कृती समोर आली आहे, ज्यामुळे परिसरातील लोक चकित झाले आहेत.

प्रातिनिधिक प्रतिमा (संग्रहित संपादित रातिमा)

आजकाल व्यस्त जीवनात, करियरच्या धावपळीत जोडप्यांचे घराकडील लक्ष थोडे कमी झाले आहे. याचसाठी घरातील कामे करण्यासाठी इतर कोणाचीतरी मदत घेतली जाते. मात्र अशाप्रकारे घरात काम करणाऱ्या लोकांवर कसा विश्वास ठेवायचा? असा प्रश्न निर्माण होत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद (Ghaziabad) येथे, घरात काम करणार्‍या महिलेची (Maid) अशी एक कृती समोर आली आहे, ज्यामुळे परिसरातील लोक चकित झाले आहेत.

इंदिरापुरममध्ये असलेल्या ज्ञानखंद -2 परिसरातील घरामध्ये काम करणारी महिला, भांडी धुण्यासाठी चक्क आपल्या मूत्राचा वापर करीत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पहा व्हिडीओ -

सदर महिलेचा हा किळसवाणा प्रकार फ्लॅटमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहे की, या महिलेने प्रथम घरातील सर्व भांडी धुतली, त्यानंतर एका भांड्यामध्ये आपले मुत्र घेऊन पुन्हा एकदा त्याने भांडी धुतली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर लोकांनी या महिलेबद्दल पोलिसांत तक्रार दिली आहे. लोक या महिलेला अटक करण्याची मागणी करीत आहेत. (हेही वाचा: अभिनेत्री किम शर्मा हिच्याविरोधात तक्रार दाखल; पगार थकवून धमकवल्याने मोलकरणीची पोलिसांत धाव)

या महिलेच्या या कृत्याला बळी पडलेल्या कुटुंबाने सांगितले की, त्यांनी त्यांच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे. ऑफिसमधून घरी आल्यानंतर एक दिवशी अचानक सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा त्यांना हा धक्कादायक प्रकार दिसून आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिलेने घरातील भांडी आपल्या लघवीने धुतलेली दिसत होती. आरोपी महिला गेल्या दोन वर्षांपासून या फ्लॅटमध्ये काम करत आहे. सुरुवातीला या महिलेने हा आरोप मान्य केला नाही, मात्र पोलिसांची भीती दाखवल्याने तिने गुन्हा मान्य केला. यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. याप्रकरणी पोलिसांनी फिर्याद नोंदविली असून पुढील कार्यवाही केली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement