Maggi With Curd: ट्विटरवर दहीसह मॅगीचा फोटो शेअर केल्याने भडकले युजर्स, पहा व्हायरल ट्विट आणि मिम्स
Maggi With Curd (PHoto Credits-Twitter)

Maggi With Curd: जगभरातील लोक कोणत्या गोष्टीचा शोध लावतील याचा काही नेम नाही. मात्र अशा काही विचित्र गोष्टी पाहिल्या की नकोसे होते. परंतु सोशल मीडियात अशा प्रकरच्या गोष्टी तुफान व्हायरल होतात. याच पार्श्वभुमीवर एका व्यक्तीने ट्विटरवर मॅगी सोबत दही खात असल्याचा फोटो शेअर केला आहे. प्रत्येकाच्या आवडीची आणि 2 मिनिटांत तयारी होणाऱ्या मॅगीचा असा पद्धतीचे फोटो पाहून ट्विटरवर काही युजर्स भडकले आहेत. तर काहींनी या फोटोवर मिम्स आणि आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.(Kaju Katli in Chicken Soup: दिवाळी निमित्त काजू कतली चिकन सूप चे मजेशीर Memes आणि Jokes व्हायरल; हैराण करणारे फोटो पाहून तुमचा विश्वास उडेल)

फेलोन मास्क (Felon Mask) नावाच्या  युजरने ट्विटरवर मॅगीसोबत दही खात असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने Maggi and curd is food for the soul ❤️ असे कॅप्शन दिले आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर युजर्सने विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ऐवढेच नाही तर मॅगी इंडिया यांना सुद्धा टॅग करण्यात आले आहे.(Kolhapur Pani Puri: शौचालयाच्या टाकीतील पाणी वपरुन चटकदार पाणीपुरी, कोल्हापूर येथील धक्कादायक प्रकार; व्हिडिओ व्हायरल)

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

दरम्यान,काही दिवसांपूर्वी पानीपुरी सोबत मॅगी खाण्याचा फोटो तुफान व्हायरल झाला होता. ते पाहिल्यानंतर युजर्सने संताप ही व्यक्त केला होता. ट्विटरवर विविध प्रतिक्रिया ही दिल्या. फुड संबंधित अशा पद्धतीचे कॉम्बिनेशन करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. याआधी सुद्धा अशा पद्धतीचे विचित्र फुड कॉम्बिनेशन पहायला मिळाले आहेत.