Jhansi Bride Viral Video: परीक्षा देण्यासाठी लग्नाचे विधी सोडून नवरा मुलगा वधूला घेऊन पोहोचला परिक्षा केंद्रावर; पहा व्हायरल व्हिडिओ

अशाप्रकारे हा किस्सा आणि लग्नाच्या वेळी परीक्षा देण्यासाठी आलेल्या जोडप्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

Jhansi Bride Viral Video (PC - Twitter)

Jhansi Bride Viral Video: नववधू परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात आल्याचे पाहून उत्तर प्रदेशातील झाशी येथे असलेल्या राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्ता महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, येथे नवरा मुलगा आपल्या नववधूला परीक्षा देण्यासाठी घेऊन आला होता. खरे तर एक दिवस आधी परिसरातील सुलतानपुरा गावात वरात होती. लग्न झालेल्या मुलीची फेरे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये परीक्षा होणार होती.

या नववधूने लग्नाचे सर्व विधी उरकून सकाळी निरोप घेतला असता तर तिची परीक्षा चुकली असती. परंतु, यावर वधू-वराने तोडगा काढला. परीक्षेनंतर लग्नाचे काही विधी करण्याचे ठरवण्यात आले. यानंतर, मध्य प्रदेशातील पृथ्वीपूर येथील रहिवासी असलेला वर अंकुश साहू आपली वधू पूजाच्या परीक्षेसाठी कॉलेजमध्ये पोहोचला. सुलतानपुरा येथील पूजा साहू (Puja Sahu) लग्नात बीए द्वितीय वर्षाची परीक्षा देण्यासाठी कॉलेजमध्ये पोहोचली. तेव्हा सर्वांच्या नजरा या जोडप्यावर खिळल्या होत्या. पूजासोबत तिचा पतीही परीक्षा केंद्रावर पोहोचला. कॉलेज कॅम्पसमध्ये उपस्थित शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी हे वेगळेचं दृश्य होतं. पूजाला परीक्षा देऊपर्यंत वर राजा बाहेर थांबला. (हेही वाचा - Shocking! स्वत:ह कुटुंबातील चौघांना पेट्रोल टाकून जिवंत जाळले, नवऱ्याने सवत आणताच संतापलेल्या पहिल्या पत्नीकडून कृत्य)

परीक्षा दिल्यानंतर मीडियाशी बोलताना पूजा म्हणाली, 'माहेर आणि सासरच्या मंडळीच्या संमतीने मी परीक्षा देण्यासाठी आले. पुढील शिक्षणासाठी सासरे परवानगी देत ​​आहेत, ही आमच्यासाठी खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे. मुलींनी लग्नानंतरही अभ्यास सोडू नये, जेणेकरून त्या काहीतरी बनून स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील. मी माझ्या सर्व मैत्रिणींना एक संदेश देऊ इच्छितो की, त्यांनी अभ्यास पूर्ण करण्याबरोबरचं काहीतरी बनण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागणार नाही.

परीक्षा संपल्यानंतर वधू-वर लग्नाचे उर्वरित विधी पूर्ण करण्यासाठी गावाकडे रवाना झाले. अशाप्रकारे हा किस्सा आणि लग्नाच्या वेळी परीक्षा देण्यासाठी आलेल्या जोडप्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.