Lalbaugcha Raja Aarogya Utsav लालबागचा राजा मंडळाच्या गणेशोत्सव ऐवजी आरोग्य उत्सव उपक्रमाचं नेटकर्‍यांनी केलं स्वागत; पहा गणेशभक्तांच्या ट्वीटर रिअ‍ॅक्शन्स!

मुंबईमध्ये यंदा लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठा न करता लालबागचा राजा आरोग्य उत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेला गणेशभक्तांनीही दिला पाठिंबा.

Lalbaghcha Raja File Image| (Photo Credits-Facebook)

मुंबईमध्ये यंदा कोरोना जागतिक आरोग्य संकटात लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा न करण्याचा मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आज सकाळी याबाबतची घोषणा होताच सोशल मीडीयामधूनही लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या (Lalbaughcha Raja Ganeshotsav Mandal) या निर्णयावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान यंदा 22 ऑगस्ट दिवशी भाद्रपद गणेश चतुर्थीला भव्य गणेशमूर्ती स्थापन करून विघ्नहर्त्याचं स्वागत करण्याऐवजी लालबागचं सार्वजनिक गणेश मंडळ "लालबागचा राजा आरोग्य उत्सव" (Lalbaugcha Raja Aarogya Utsav) आयोजित करणार आहे. यामध्ये गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) ते अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) अशा 11 दिवसांच्या काळामध्ये रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन शिबिरं राबली जाणार आहेत.

लालाबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं 87 वं वर्ष आहे. मात्र यंदा गणेशोत्सव हा आरोग्य उत्सवाच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. कोरोना व्हायरसचं वाढतं संकट पाहता अजूनही ठोस औषध किंवा लस उपलब्ध नाही. अशा वेळी प्लाझ्मा थेरपीच्या माध्यमातून कोरोनातून बाहेर पडलेल्या रूग्णाच्या रक्तातून अ‍ॅन्डी बॉडिज अत्यावस्थ कोरोनाबधिताला दिल्या जातात. त्याच्यामाध्यमातून जीवाचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातो. या उपक्रमाला चालना देण्यासाठी आता लालबागच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा पुढाकार एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. Ganesh Chaturthi 2020: 'उंची नाही तर भक्ती महत्त्वाची, मूर्ती 4 फुटापर्यंत असावी', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.

लालाबागच्या राजाच्या 'आरोग्य उत्सव' उपक्रमावर कौतुकाचा वर्षाव

श्रद्धेचा भाग 

सामाजिक भान 

मुंबईच्या सुरक्षेसाठी

आदर्श निर्णय 

आरोग्य उत्सवाचं कौतुक

दरम्यान प्रत्येक वर्षी लालबागचा राजा पाहण्यासाठी देशा-परदेशातून नागरिक मुंबईमध्ये दाखल होत असतात. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची अनेक गणेशभक्तांमध्ये श्रद्धा आहे. बॉलिवूड, क्रीडा, राजकारण, संगीत क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्ती दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी येतात. या गणेश मंडळाच्या विसर्जनाची मिरवणूक देखील सुमारे 12-18 तास चालते. मात्र यंदा ही धूम नसेल.