Kent Atta Dough Maker Poster: हेमा मालिनी करत असलेल्या केंट अटा मेकर जाहिरातीचे 'आक्षेपार्ह' पाहून युजर्स संतापले
बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी-स्टारर केंटच्या या जाहिरातीत घरकाम करणाऱ्यांना 'संक्रमित' म्हणून संबोधले. हे पोस्टर त्यांच्या इंस्टाग्राम मोहिमेचा एक भाग आहेत.
भारतीय आरोग्यसेवा उत्पादनांची कंपनी केंट आरओ सिस्टम्स (Kent RO Systems) यांना सोशल मीडियावर नुकत्याच कोरोना व्हायरस प्रतिबंधक पोस्टरमुळे नवा वाद सुरु झाला आहे. बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी (Hema Malini) आणि लेक इशा देओल (Esha Deol) करत असलेल्या केंटच्या या जाहिरातीत घरकाम करणाऱ्यांना 'संक्रमित' म्हणून संबोधले. हे पोस्टर त्यांच्या इंस्टाग्राम मोहिमेचा एक भाग आहेत ज्यात असे लिहिले आहे की, "आपण आपल्या घरकाम करणाराला कणिक हाताने मळून घेऊ देत आहात का? तिचे हात संक्रमित असू शकतात. आरोग्य आणि शुद्धतेवर तडजोड करू नका. कणिक हाताने मळण्याऐवजी केंट अटा आणि ब्रेड मेकर निवडा. यावेळी स्वयंचलनाने स्वच्छतेची काळजी घेऊया." केंटने त्यांच्या आता-डिलीट केलेल्या जाहिरातींसाठी विविध ट्वीटमध्ये स्वतःला शुद्ध करण्यास सांगितले आणि त्यांच्या घरकाम करणाऱ्या बाईला पीठ मळू दिले जाऊ नये कारण त्यांचे हात संक्रमित असू शकतात. (COVID 19 च्या पार्श्वभूमीवर खादी आणि ग्रामोद्योग कमिशन तर्फे सिल्क मास्कची निर्मिती; 'ही' आहे खासियत, पहा फोटो)
या पोस्टरवर अनेकांनी आक्षेप घेतला आणि म्हटले की कोरोना घरकाम कारण्यांनी आणलेले नाही परंतु जगभर प्रवास करणारे विशेषाधिकारप्राप्त लोकांकडून आणले गेले आहेत. या जाहिरातीचे स्क्रीनशॉट ट्विटरवर शेअर केले गेले होते आणि बर्याच यूजर्सनी कंपनीला त्यांच्या शब्दांसाठी फटकार लगावली. ट्विटरवर काहींनी त्यांच्याकडे जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. फाये डिसूझापासून ते इतर ट्विटर यूजर्सनी जाहिरातींचे स्क्रीनशॉट्स शेअर केले आणि आता ते ट्विटरवर व्हायरल होत आहे.
'विद्रोही'
जाहिरात आता हटविण्यास सांगण्यात येत आहे
आक्षेपार्ह
'डोक्यातली घाण'
प्रथम शुद्ध आणि फिल्टर करावे
अॅड क्लासिस्ट आहे
दरम्यान, या कठीण वेळी जेव्हा कोविड-19 च्या भेदभावाविरुद्ध लढाईत लोक एकत्र येत आहेत अशा स्थितीत या मोठ्या कंपन्यांद्वारे या रोगाविरूद्ध लोकांमध्ये ऐक्य धोक्यात आणण्याचे काम करत आहे. संतापजनक नेटिझन्स यापुढे ब्रँडकडून खरेदी न करण्याचा विचार करीत आहेत. कोरोना व्हायरसमुळे बर्याच घरकाम करणाऱ्यांनी आपल्या नोकर्या गमावल्या आणि अशा कठीण काळात सरकार लोकांना त्यांना पगार देण्यासाठी उद्युक्त करीत आहे.