Internet User Alert: आता 2023 मध्ये 'या' गोष्टी कधीही इंटरनेटवर सर्च करू नका, नाहीतर येऊ शकता अडचणीत (See List)

विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात त्याचा खूप फायदा होतो. मात्र प्रत्येक चांगल्या गोष्टीचे काही नकारात्मक परिणामही आहे.

google (PC - File Photo)

आजच्या काळात आपल्याला काही जाणून घ्यायचे असेल तर, एकमेकांना विचारण्याऐवजी आपण लगेच गुगलवर (Google) ती माहिती सर्च करतो. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही अगदी कमी वेळात अनेक गोष्टी जाणून घेऊ शकता. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, ऑफिस, रिसर्च अशा अनेक कामांसाठी लोक गुगलचा आधार घेतात. छोट्या-मोठ्या गोष्टींची उत्तरे इथे लगेच मिळतात. गुगलमुळे गोष्टी इतक्या सोप्या झाल्या आहेत की जवळजवळ प्रत्येकजण त्यावर अवलंबून आहे. पण हे 2023 आहे. आता इथूनपुढे तुम्हाला सर्व काही गुगलवर सर्च करता येणार नाही. अशा काही गोष्टी आहे कदाचित ज्या तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला ते महागात पडू शकते. म्हणजेच तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळावे.

बॉम्ब कसा बनवावा?

अगदी गम्मत म्हणूनही कधी गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा? हे सर्च करू नका. असे केल्यास तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. तुम्ही गुगलवर असा सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.

बाल अश्लील कंटेंट (Child Pornography)-

जर तुम्ही गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गोष्टी सर्च केल्या तर तुमचा आयपी पत्ता ओळखून तुम्हाला तुरुंगातही टाकले जाऊ शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे किंवा ते डाउनलोड करून पाहणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या संबंधित गोष्टी अजिबात गुगलवर सर्च करू नका. हा खूप संवेदनशील विषय असल्याने त्याबाबत पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात.

कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध-

कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध लोकांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो. कारण कोणीतरी गुन्हा करण्याची योजना आखत असेल तर सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती मिळेल व त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकेल. म्हणजेच, एखाद्याचा खून कसा करायचा?, विष कसे बनवायचे? किंवा संशय न येता गुन्हा कसा करायचा? इत्यादी सर्चमुळे पोलीस तुमच्या दारात येतील. विशेषत: खून, अपहरण, ड्रग्ज किंवा तस्करी संबंधित विषयांबाबत वारंवार सर्च केल्यास तुमच्यासाठी नक्कीच गंभीर संकट उभे राहील.

गर्भपात बद्दल-

गर्भपात कसा करायचा? हे तुम्ही कधीही गुगलवर सर्च करू नये. बरेच लोक इथे 'How to abort' असे सर्च करतात, पण त्यामुळे तुमच्यासाठी मोठी समस्या उभी राहू शकते. गुन्ह्याव्यतिरिक्त जे काही संवेदनशील विषय आहेत, ज्यांचा ऑनलाइन शोध घेणे टाळावे, त्यात गर्भपात ही महत्वाची बाब आहे. कारण भारतात गर्भपाताबद्दल कठोर वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हे केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकानेच केले पाहिजे. त्यामुळे याबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास गुगलवर सर्च करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे चांगले. (हेही वाचा: ट्विटरकडून ४८ हजार भारतीय ट्विटर अकाउंट बॅन, एलॉन मस्क यांनी ट्विट करत स्पष्टचं सांगितलं)

दरम्यान, कोणत्याही प्रकारची माहिती शोधण्यासाठी गुगल निश्चितपणे एक सुलभ मार्ग आहे. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रात त्याचा खूप फायदा होतो. मात्र प्रत्येक चांगल्या गोष्टीचे काही नकारात्मक परिणामही आहे. वरील नमूद केलेल्या कोणत्याही बाबी गुगलवर सर्च केल्यास त्यावर नजर ठेवण्यासाठी आणि सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकारी प्रयत्नशील आहेत. म्हणून, तुम्ही गुगलवर अशा कोणत्याही गोष्टी सर्च करू नका ज्याद्वारे तुम्हाला संकटांचा सामना करावा लागेल.