International Condom Day 2020: 'व्हॅलेंटाईन डे' आधी संरक्षणाची आठवण करून देण्यासाठी काही मजेशीर कंडोम Memes आणि Jokes
कंडोम दिन हा अगदी व्हॅलेंटाईन डेच्या आधी साजरा केला जातो, यामागे एकाच महत्वाचे कारण आहे ते म्हणजे जागरुकता निर्माण करणे. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रणयाचे क्षण
दरवर्षी 13 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिन (International Condom Day) साजरा केला जातो. कंडोम दिन हे नावच सूचित करते की, हा दिवस जन्म नियंत्रणाच्या सर्वात लोकप्रिय पध्दतीला, म्हणजेच कंडोमला समर्पित आहे. सुरुवातीच्या काळात कंडोम किंवा जन्म नियंत्रण हा निषिद्ध विषय मानला जात असे. मुले होणे ही देवाची इच्छा आहे, असे समजून मुले जन्माला घातली जात असत. मात्र आजकाल जनजागृतीमुळे, सोशल मीडियामुळे ड्युरेक्स (Durex), मॅनफोर्स (Manforce) सारख्या कंडोमच्या ब्रँडवरही चर्चा होताना दिसून येत आहे.
मात्र आजही कंडोम सारख्या महत्वाच्या गोष्टीचे विषय हसण्यावारी घेतले जातात. जन्म नियंत्रण यासह कंडोमचा उपयोग, एचआयव्ही, एड्स, एसटीआय आणि एसटीडीपासून संरक्षण म्हणूनही केला जातो. अशाप्रकारे कंडोम ही महत्वाची गोष्ट आहे.
आज कंडोम दिनानिमित्त कंडोमबाबतच्या सिरीयस गोष्टी शेअर करण्यासोबतच आम्ही घेऊन आलो आहोत काही गमतीशीर मीम्स. हे केवळ मजेदारच नाहीत, तर लैंगिक संबंध ठेवताना संरक्षणाबाबत जागरूकताही पसरवण्यासाठी मदत करतील. हे मीम्स पाहिल्यावर आपल नक्कीच कंडोम बाळगण्यास आणि ते वापरण्यास तयार व्हाल. (हेही वाचा: Condom Mistakes: कंडोम घालताना पुरुषांकडून होतात चुका; जाणून घ्या गर्भधारणा टाळण्यासाठी कसा वापरावा निरोध)
View this post on Instagram
Be freeeeeee 🍆 Follow @fried_mustard
A post shared by Dijonay Jones (@fried_mustard) on
View this post on Instagram
Be smart #smart #condom #condommemes #condommeme
A post shared by D-enda dis Dick (@memes_m869) on
दरम्यान, लक्षात घ्या कंडोम दिन हा अगदी व्हॅलेंटाईन डेच्या आधी साजरा केला जातो, यामागे एकाच महत्वाचे कारण आहे ते म्हणजे जागरुकता निर्माण करणे. त्यामुळे यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रणयाचे क्षण अनुभवणार असाल तर कंडोम जरूर वापरा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)