Imran Khan Death Hoax: ट्विटरवर #RipImranKhan हॅशटॅग झाले ट्रेन्ड; इमराम खान यांच्या मृत्युच्या बातमीनंतर सोशल मीडियावर खळबळ, सत्य घ्या जाणून

इमरान खान यांच्या मृत्युच्या बातमीवर विश्वास ठेवून अनेकांनी शोक व्यक्त केला आहेत.

Pakistan Prime Minister Imran Khan | (File photo)

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान (Imran Khan) यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीने (Fake News) सोशल मीडियावर (Social Media) एकच खळबळ माजली आहे. इमरान खान यांच्या मृत्युच्या बातमीवर विश्वास ठेवून अनेकांनी शोक व्यक्त केला आहेत. महत्वाचे म्हणजे, जुन्या व्हिडिओमधील इमरान खान यांचा एक फोटो सोल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे ट्विटरवर #RipImranKhan ट्रेंड सुरू झाला आहे. दरम्यान, काही ट्विटमध्ये कराची येथे झालेल्या बॉम्बस्फोटात पंतप्रधान इमरान खान यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे.

इमरान खान यांची प्रकृत बिघडल्याने त्यांना काही दिवसांपूर्वी एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इमरान खान यांनी रुग्णालयात असताना एका व्हिडिओच्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला होता. याच व्हिडिओमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. तसेच इमरान खान यांचा मृत्यू झाला आहे, असे या फोटोला कॅप्शन देण्यात आले आहे. यामुळे सोशल मीडियावर एकच खळबळ माजली आहे. मात्र, इमरान खान यांच्यासंबंधित सोशल मीडियावर व्हायरल होणारी बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. हे देखील वाचा- Mumbai Sea Cadet Corps: मुंबई सी कॅडेट कॉर्प्स महिलांनी पुन्हा एकदा केले Sailor’s Hornpipe

ट्वीट-

ट्वीट-

इमरान खान यांचा जुना व्हिडिओ-

 

सोशल मीडियावर कोणतीही बातमी झपाट्याने व्हायरल होत असते. मात्र, या बातमीमागची सत्यता तपासल्याशिवाय इतरांना शेअर करणे, किती धोकादायक ठरू शकते? हे वरील बातमीतून स्पष्ट होत आहे. यामुळे कोणतीही बातमी शेअर करण्याआधी तिची पडताळणी करणे आवश्यक आहे.