Husband Wife Viral Video: अस्सा नवरा तशी बायको, रोमान्स पाहून अनेक जण उदास; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, अरे देवा!

Bride Kiss Groom Video: लग्न जरी पृथ्वी तलावावर होत असली तरी त्याच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, अशा आशयाची एक म्हण प्रचलीत आहे. त्यामुळे अनेकदा परस्परांविरोधीत गुण, रुप असलेली अनेक जोडपी आपण पाहतो तेव्हा ही म्हण काहीशी अधिक प्रकर्षाने आठवते. काही लोक तर नशिबानेच अशी वधू (Bride Groom Indian) मिळते असेही म्हणतात.

Husband Wife Viral Video: अस्सा नवरा तशी बायको, रोमान्स पाहून अनेक जण उदास; व्हायरल व्हिडिओ पाहून यूजर्स म्हणाले, अरे देवा!
Husband Wife Viral Video | (PC - Instagram)

Bride Kiss Groom Video: लग्न जरी पृथ्वी तलावावर होत असली तरी त्याच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात, अशा आशयाची एक म्हण प्रचलीत आहे. त्यामुळे अनेकदा परस्परांविरोधीत गुण, रुप असलेली अनेक जोडपी आपण पाहतो तेव्हा ही म्हण काहीशी अधिक प्रकर्षाने आठवते. काही लोक तर नशिबानेच अशी वधू (Bride Groom Indian) मिळते असेही म्हणतात. सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालेल्या एका व्हिडिओबाबतही यूजर्सनी अशाच काहीशा भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओत वर वधुचे एक जोडपे एकमेकांसोबत रोमान्स करताना पाहायला मिळत आहे. वधुचा (Bride Groom) वराला चुंबन करतानाचा हा रोमान्स पाहून अनेकांना धक्का बसतो आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ आपण येथे पाहू शकता.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत आपण पाहू शकता की, हे जोडपे एकमेकांसोबत रोमान्स करताना दंग झाले आहे. वधू वराला एक हलकेसे चुंबन करते आणि दोघेही एकमेकांना आय लव्ह यू म्हणतात. दरम्यान, वधुने किस केल्यावर वर काहीसा हसतो. हसताना त्याचे दात दिसतात. गंमत अशी की त्याचे काही दात पडलेले असतात. त्यामुळे तो काहीसा बोळकाही दिसतो. सहाजिकच स्पष्ट जाणवते की, वर आणि वधू यांच्या वयात कमालीचे अंतर आहे. जे पूर्वीच्या काळी पाहायला मिळत असे. (हेही वाचा, BJP Leader Viral Video: भाजप नेत्याला बायकोने चप्पलने चोपले; भलत्याच बाईशी रोमान्स आला अंगाशी, पाहा व्हायरल व्हिडिओ)

ट्विट

व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण पाहू शकता की, एक सुंदर नवरी गोड हसत आहे. दरम्यान, आपल्या बाजूला बसलेल्या एका ज्येष्ठ नवरदेवाला ती I LOVE YOU म्हणते. दरम्यान व्हिडिओत दिसणारे जोडपे हे वास्तवात पती पत्नी आहेत की, एखाद्या चित्रपटासाठी दृश्ट चित्रीत करण्यासाठी ते अभिनय करत आहेत याची पुष्टी होऊ शकली नाही. सोशल मीडीया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावर अनेक लोक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

(The above story first appeared on LatestLY on Sep 05, 2022 05:22 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).