Hit and Run Tragedy: बसने दुचाकीस्वाराला चिरडले; अहमदाबाद येथील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video)

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्या वाचकांसाठीही सूचना अशी की, व्हिडिओतील दृश्य आपणास विचलीत करु शकते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यात पाहायला मिळते की, रस्त्यावरुन जाणाऱ्या ATMS बसने दुचाकीस्वाराला जागेवरच चिरडले.

ATMS Hit and Run Video | (Photo Credit - X)

Ahmedabad ATMS Hit and Run Video: अहमदाबाद येथील एका हृदयद्रावक घटनेने सोशल मीडियावर नेटीझन्सचे लक्ष विचलीत केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आमच्या वाचकांसाठीही सूचना अशी की, व्हिडिओतील दृश्य आपणास विचलीत करु शकते. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या दृश्यात पाहायला मिळते की, रस्त्यावरुन जाणाऱ्या ATMS बसने दुचाकीस्वाराला जागेवरच चिरडले. या घटनेनंतर बस चालकाने बससह घटनास्थळावरुन पळ काढला. या हीट अँड रन प्रकराबद्दल जोरदार संताप व्यक्त केला जात आहे.

विचलीत करणारी दृश्ये

प्राप्त माहितीनुसार ही घटना 19 एप्रिल रोजी अहमदाबाद शहरात घडली. ज्यामध्ये बसने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हिट अँड रन प्रकारातील ही  घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मात्र, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी दृश्ये अतिशय विचलीत करणारी आहेत. सांगितले जात आहे की, या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव नवीन पटेल असे आहे. हा व्यक्ती 52 वर्षांचा आहे. (हेही वाचा, Hit And Run Accidents Cases: 'हिट अँड रन' पीडितांची नुकसान भरपाई वाढण्याची शक्यता; सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश)

ATMS बसने दिली दुचाकीला धडक

नवीन पटेल हे आपल्या दुचाकीवरुन अहमदाबाद येथील भुलाभाई क्रॉसरोडवर असलेल्या चौकातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. याच वेळी भरधाव वेगाने आलेल्या अहमदाबाद म्युनिसिपल ट्रान्सपोर्ट सर्व्हिस (ATMS) बसने नवीन यांना धडक दिली. ते आपल्या दुचाकीसह खाली कोसळले आणि बसच्या चाकाखाली आले. ज्यामुळे ते जागीच चिरडले गेले. धक्कादायक म्हणजे ही घटना घडल्याचे लक्षात येऊनही बस चालकाने बस अत्यंत बेदरकारपणे हाकली आणि घटनास्थळावरुन बससह पळ काढला. (हेही वाचा, Hit-and-Run on Atal Setu Bridge: कुटुंबासह Ola मधून जाणार्‍याच्या गाडीला चूकीच्या साईड ने आलेल्या SUV Car ने ठोकलं; ट्वीट सह फोटो वायरल)

सामाजिक अमानवीपणाचे दर्शन

घटना घडल्यानंतर पुढचा प्रसंग तर आणखी मन विचलीत करणारा आहे. नवीन पटेल हे आपल्या दुचाकीसह रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले असतानाही लोक अत्यंत सामान्यपणे व्यवहार करत होती. वाहने रस्ता ओलांडत होती, दुचाकीस्वार नेहमीच्या पद्धतीने ये-जा करत होते. कोणाचेही नवी पटेल यांच्याकडे लक्ष नव्हते. मग थोड्या वेळानंतर हळूहळू गर्दी जमू लागली. उपस्थित नागरिकांना वेळीच हस्तक्षेप करुन पटेल यांना वैद्यकीय मदत पुरवता आली असती. पण, तसे घडले नाही. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडिओ

अहमदाबाद येथे घडलेल्या या घटेने मानवाचे आयुष्य किती क्षणभंगूर आहे हे दाखवून दिले असले तरी, मानवी निर्दयताही दर्शवली आहे. या आधीही अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. हिट अँड रन हे अत्यंत बेदरकार वर्तन मानले जाते. अनेकदा लोक अपघात करतात, आपल्या वाहनाची इतरांना धडक देतात आणि घटनास्थळावरुन पळ काढतात, ज्यामुळे अनेकदा मानवी मूल्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होते.