Happy New Years' Eve 2020 Funny Memes & Jokes: नववर्ष पूर्वसंध्येला प्रत्येकाची असणारी मन:स्थिती मीम्स आणि जोक्स द्वारे सोशल मीडियावर सादर; पहा तुम्ही रिलेट करु शकताय का?
अवघ्या काही तासांत आपण नवीन वर्षात पर्दापण करु. हे वर्ष तसं सर्वांसाठीच काहीसं कठीण आणि वेगळं होतं. त्यामुळे नव्या वर्षाकडून लोकांना अधिक आशा आहे. म्हणूनच नववर्षाचा उत्साहही आहे.
2020 हे वर्ष संपत आलं. अवघ्या काही तासांत आपण नवीन वर्षात पर्दापण करु. हे वर्ष तसं सर्वांसाठीच काहीसं कठीण आणि वेगळं होतं. त्यामुळे नव्या वर्षाकडून लोकांना अधिक आशा आहे. म्हणूनच नववर्षाचा उत्साहही आहे. या वर्षातले काही कटू गोड आठवणी घेऊन आपण नववर्षात पर्दापण करणार. परंतु, या वर्षासारखं पुढील वर्ष असू नये अशी मनोमनी प्रार्थनाही अनेकजण करत असतील. तसंच नववर्षासाठी नेहमीप्रमाणे काही संकल्पही केले असतील. या सर्व संमिश्र भावना नेटकरी मीम्स, जोक्स च्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. (WhatsApp Pay Funny Memes & Jokes: व्हॉट्सअॅप पे वरील धम्माल मीम्स आणि जोक्स सोशल मीडियात व्हायरल!)
हे फनी मीम्स आणि जोक्स पाहून तुम्हीही त्याच्याशी रिलेट करु शकाल. नविन वर्षाच्या स्वागताचा उत्साह, जून्या वर्षातील चांगल्या-वाईट आठवणी याच्यातून निर्माण झालेली मन:स्थिती ही मीम्समध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सोबतच काही मजेशीर जोक्सही आहेत. (New Year's Eve Party at Home: नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरच्या घरी 'अशा' पद्धतीने करा थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन!)
New Years' Eve 2020 Funny Memes & Jokes:
मीम्स आणि जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होणाच्या सध्याचा काळ आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी देखील हे मीम्स सर्रास शेअर केले जातात. योग्य व्यक्तीला पाठवलेही जातात. दरम्यान, अलिकडच्या काळात अनेक चांगल्या, वाईट, गंभीर किंवा अगदी साध्या गोष्टींवरही मीम्स बनवून व्हायरल केले जात आहेत.