धक्कादायक: लग्नाच्या काही तास आधी नवरीचे जबरदस्तीने अपहरण, पहा व्हिडीओ

ही नवरी लग्नाचा मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आली होते.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: Pixabay)

पंजाब येथील मुक्तसार (Muktsar) भागात लग्नापूर्वी काही तास नवरीचे अपहरण करण्यात आल्याची घटना घडली आहे.  ही नवरी लग्नाचा मेकअप करण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये आली होते. यावेळी 6 जणांनी तिला जबरदस्तीने गाडीत घालून तिचे अपहरण केले. सीसीटीव्ही मध्ये ही संपूर्ण घटन कैद झाली. त्यानंतर लगेचच पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत यातील दोघांना अटक केली आहे. अपहरण करणाऱ्यांपैकी एकासोबत या मुलीचे अफेअर होते त्यामुळे हे कृत्य घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ताग्नाच्या मेकअपसाठी ही तरुणी मुक्तसारच्या गांधीचौकानजीकच्या ब्युटी पार्लरमध्ये आली होती. त्यावेळी हे अपहरणकरते गाडी घेऊन आली आणि बंदुकीचा धाक दाखवत मुलीला ओढून घेऊन जाऊ लागले. मुलीने प्रतिकार केला मात्र जबरदस्तीने तिला गाडीत बसवण्यात आले. मुलीचे अपहरण झाल्याने त्या दिवशी मुलीचे लग्न होऊ शकले नाही. पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत तरुणीच्या भावाने तलविंदर सिंह, यदविंदर सिंह यांच्यासहित काही अज्ञातांवर संशय व्यक्त केला होता. तपासानंतर अखेप फिरोजपूर कँट येथे तरुणी सापडली. (हेही वाचा :  अपहरण करुन शेजाऱ्याच्या गर्भवती शेळीवर रात्रभर बलात्कार! प्रकृती गंभीर, नराधमाला अटक)

यातील एकासोबत मुलीचे अफेअर होते. मात्र हा मुलगा ड्रग्ज घेत असल्याने मुलीच्या कुटुंबाने या लग्नाला नकार दिला होता. त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य घडले असावे असे सांगण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे बलजित सिंह आणि हरप्रीत सिंह अशी आहेत. मुख्य आरोपी तलविंदर आणि इतर चार आरोपी अद्याप फरार आहेत.