Giraffe Viral Video: दक्षिण आफ्रिकेत माऊंटन बायकरला Safari Park मध्ये जिराफ जेव्हा सुंगतो... पहा हा वायरल व्हिडिओ

त्याचा हा अनुभव लाईफटाईम ठरला आहे

जिराफ व्हिडिओ (Photo Credits: Instagram)

Timmy Moser हा साऊथ आफ्रिकेतील फोटोग्राफर माऊंटन बायकिंगसाठी गर्लफ्रेंड Tazz Scriven सोबत Lion and Safari Park मध्ये गेला होता. त्याचा हा अनुभव लाईफटाईम ठरला आहे. या सफारी मध्ये फिरताना त्याच्यासमोर एक जिराफ आला आणि काळ त्याने Timmy Moser ला सुंगलं. Timmy Moser ने देखील या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडीयात इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. सध्या तो चांगलाच वायरल देखील होत आहे.

Timmy Moser ने हा प्रसंग सांगताना आपण जिराफाजवळ सुमारे तासभर होतो. तो आजूबाजुला फिरत होता. सुंगत होता. तो जसा जवळ आला तसा Timmy Moser मागे सरकत होता आणि त्याची गर्लफ्रेंड हे क्षण टिपत होती. अनेकांनी Timmy Moser ला त्याने व्हिडिओ कसा शूट केला? हा व्हिडीओ एडिटेड आहे का? असा देखील प्रश्न विचारल्याचं त्यानं पोस्ट मध्ये म्हटलं आहे. पण हा व्हिडिओ त्याने गो प्रो ने शूट केल्याचं म्हटलं आहे. (नक्की वाचा: Tiger Viral Video: बर्फ जमलेल्या तलावावर चालताना घडले असे काही आणि चक्क वाघ ही घाबरला; पहा व्हिडिओ).

Timmy Moser चा व्हीडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Timmy (@mosertimmy)

दरम्यान Timmy Moser च्या या व्हीडिओला जगभरातून प्रतिसाद मिळत आहे. हा व्हिडिओ वायरल झाला असून त्याला 10 मिलियन पेक्षा अधिक व्ह्यूज सोशल मीडीयावर मिळाले आहेत.