Gatari 2020 Memes and Jokes (Photo Credits: Instagram)

आषाढी अमावास्येला दिव्यांची अमावस्या म्हणतात. या दिवशी दिपपूजन केले जाते. असे जरी असले तरी गटारी अमावस्या म्हणून देखील याचं सेलिब्रेशन केलं जातं. श्रावण महिन्यात मांसाहार घेतला जात नाही. त्यामुळे श्रावण सुरु होण्यापूर्वी मांसाहारावर ताव मारण्यसाठी गटरीचे जोरदार सेलिब्रेशन केले जाते. यंदा 20 जुलै रोजी आषाढी अमावस्या आहे. म्हणजेच गटारी. मांसाहार प्रिय असणाऱ्यांसाठी सेलिब्रेशनची संधी. या दिवशी मासे, मटण, चिकन यांच्या विविध पदार्थांवर ताव मारला जातो. तसंच श्रावणात मद्यसेवनही टाळले जाते. त्यामुळे गटारी निमित्त मस्त पार्ट्या रंगतात. पण 20 जुलै रोजी सोमवार असल्याने 19 जुलै रविवारचा दिवस गटारी सेलिब्रेशनसाठी मस्त जुळून आला आहे. (गटारी अमावस्या निमित्त मराठी संदेश, Images, WhatsApp Status, Messages द्वारे मासांहार करणाऱ्यांना द्या मजेशीर शुभेच्छा!)

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गटारीचे जोरदार सेलिब्रेशन होईल. गटारीनिमित्त मांसाहारवर ताव मारला जाईल. याच गटारी सेलिब्रेशनचे अनेक मीम्स, जोक्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या मीम्सची चलती असल्याने विशेष प्रसंग, घटना, एखाद्या व्यक्तीचे वक्तव्य या कशावरही मीम्स तयार केले जातात.

गटारी 2020 मीम्स आणि जोक्स:

 

View this post on Instagram

 

गटारी special😜🍻🍗 @advance_marathi #marathimeme #marathijokes #marathikatha #marathitroll #marathifun #gatari

A post shared by Advance Marathi (@advance_marathi) on

 

View this post on Instagram

 

Some of you, but under the table Sab chalta hai😜😜 #gatari #amas #goa #party #partytime #recent

A post shared by ek paav extra (@ek_paav_extra) on

गटारी सेलिब्रेशन दरवर्षी जोरदार होत असले तरी यंदा कोरोना व्हायरसच्या संकटामुळे मित्रपरिवार किंवा कुटुंबियांसह गटारी सेलिब्रेशन करता येणार नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे जोक्स, मीम्स शेअर करुन गटारी सेलिब्रेशचा आनंद तुम्ही नक्कीच वाढवू शकता. हॅप्पी गटारी!